जिल्हाधिकारी चंद्रपूर व चंद्रपूर पोलिसांचा चेंडू चिमूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे!… –खरबो रुपयांचे अवैध मूरुम उत्खनन प्रकरण.. — पोलिसांनी हात झटकले! — डल्ला कोण मारतोय..
Summary
चिमूर तालुक्यातील खरबो रुपयांच्या अवैध मूरुम उत्खननाचे प्रकरण गंभीर व गडद बनत चालले असून,चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी व चंद्रपूर पोलिसांनी सदर अवैध मूरुम उत्खननाच्या चौकशीचा चेंडू आता चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडे टोलविला आहे. श्रिकांत भांगडिया,सुशील कोठारी,नितीन पाचघरे यांनी शंकरपूर-चिमूर हायवे […]
चिमूर तालुक्यातील खरबो रुपयांच्या अवैध मूरुम उत्खननाचे प्रकरण गंभीर व गडद बनत चालले असून,चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी व चंद्रपूर पोलिसांनी सदर अवैध मूरुम उत्खननाच्या चौकशीचा चेंडू आता चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडे टोलविला आहे.
श्रिकांत भांगडिया,सुशील कोठारी,नितीन पाचघरे यांनी शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावावर चिमूर तालुकातंर्गत सन २०१८ पासून सपाट्याने गौण खनिज मूरुमाचे उत्खनन केलेले आहे व सुरू आहे,याचबरोबर जांभूळघाट येथील लक्ष्मण भानुदास घाडगे यांनी सुध्दा अवैध मार्गाने गौण खनिज मूरुमाचे भरमसाठ उत्खनंन केले आहे.या सर्वांनी उत्खनंनाचे नियम धाब्यावर बसवून अवैधपणे मूरुमाचे उत्खनन केले आहे.
श्रिकांत भांगडिया हा चिमूर आमदारांचा सख्या भाऊ असल्यामुळे,त्या तिघांच्या कंपनीद्वारे करण्यात आलेल्या अवैध मूरुम उत्खननाकडे चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक,संबंधित मंडळ अधिकारी,तलाठी यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.तद्वतच जांभूळघाट येथील लक्ष्मण भानुदास घाडगे यांना तहसीलदार संजय नागटिळक यांचा आशिर्वाद असल्याने,त्याच्याही अवैध मूरुम उत्खननाकडे मंडळ अधिकारी व तलाठी कायमचे दुर्लक्ष करीत आहेत.
खरबो रुपयांच्या अवैध मूरुम उत्खननाची तक्रार महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री,गृहमंत्री,विभागीय आयुक्त नागपूर,पोलिस आयुक्त नागपूर,जिल्हाधिकारी चंद्रपूर,पोलिस अधीक्षक चंद्रपूर,उपविभागीय अधिकारी चिमूर,पोलिस निरीक्षक चिमूर,पोलिस निरीक्षक भिसी,यांच्याकडे केली होती व फौजदारी कारवाई आणि दंडात्मक कारवाईची मागणी केली होती.
उपविभागीय अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत या सबबीखाली चंद्रपूर पोलिसांनी अवैध मूरुम उत्खननाच्या प्रकरणातून काढता पाय घेतला असून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे,चिमूर तालुक्यातील खरबो रुपयांच्या अवैध मूरुम उत्खनन प्रकरणाच्या चौकशीचा चेंडू टोलविला आहे.
उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ हे खरबो रुपयांच्या अवैध मूरुम उत्खननाची सखोल चौकशी करणार काय?संघटित मूरुम तस्कर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करणार काय?व मोजमाप अंतर्गत दंडात्मक कारवाई आणि इतर प्रकारची कारवाई संबंधितांवर करणार काय?याबाबत त्यांच्या आजपर्यंतच्या भुमिकान्वये अनुभवावरून शंकाच आहे.
मात्र,खरबो रुपयांच्या अवैध मूरुम उत्खननातंर्गत डल्ला कोण मारतोय हे आज ना उद्या चौकशी द्वारे समोर आणण्याचा मानस तक्रार कर्त्यांचा आहे.