जितकं जमत नाही??तितकं..माझेशी…..सहज जमतं . हेच सत्य आहे ग !
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम.
दि. ४ एप्रिल २०२१
जगातील बऱ्याच क्षेत्रात कार्यरत राहून अनेक विषयांवरील गोष्टींचा अभ्यास केला. त्यातील हा एक विषय सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात बराच महत्वाचा वाटला. काही स्त्रिया पुरुषांशी जास्त मनमोकळं बोलू शकतात. त्यांचं सिक्रेट सांगण्यासाठी त्या पुरुषाचीच निवड करतात हे बरेचदा ऐकायलाही मिळाले. आज जेव्हा माझी जिवलग S ढसाढसा रडली….आणि वैयक्तिक स्तरावरील काही गोष्टी मनमोकळेपणाने बोलली तेव्हा काही प्रमाणात होणाऱ्या चुका निश्चितपणे सुधाराव्या असे मनात ठामपणे ठरविले.आपल्या मनात सुधारणा घडवून आणली पाहिजे असे खात्रीने ठरविलें.
आई सर्वांनाच हवी असते पण मुलींना मात्र बाप जास्त हवा असतो.अत्याचार फक्त स्त्रियांवरच होतात असं नाही. स्त्रियांनी केलेल्या पुरुषांवरच्या अत्याचाराची साधी दखलही घेतली जात नाही. उलट तो चेष्टेचा विषय बनतो. कायदाही पुरुषांवर झालेला अन्याय सहजासहजी स्वीकारत नाही.
आई की बायको या मोठ्या कौटुंबिक धारदार कात्रीत सापडलेला पुरुष हा सुद्धा स्त्रियांसारखंच सहनशीलतेचं उत्तम उदाहरण असतो. घर तुटू नये म्हणून सर्वात जास्त प्रयत्न पुरुषच करत असतो.
रेल्वेत प्रवास करत असताना डब्यात स्त्रिया चढल्या तर त्यांना स्वतःची जागा देणारे पुरुष असतात. तसेच आपला धक्का त्यांना लागून त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणारे पुरुषही असतात. लेडीज डब्यात असं बघायला मिळत नाही.यशस्वी स्त्रीच्या मागे भक्कमपणे उभं राहणारा पुरुष असतो मग तो घरातला असेल नाहीतर बाहेरचा !
पुरुषांचं प्रेम अव्यक्त असते. त्याला कृतीची जोड असते. त्याला चार चौघात रडायचं स्वातंत्र्य नसतं. तो चालताना खाली पडला तर त्याला उचलायला गर्दी जमत नाही. सॉफ्ट कॉर्नर त्याच्या नशिबात फार कमी असतो.पुरुषांसाठी त्यांचा मर्दपणा हा वीक पॉईंट असतो. त्यांना तो सिद्ध करता आला नाही तर त्यांचं आयुष्य संपल्यात जमा असतं. सर्वांना सांभाळून आणि सामावून घ्यायची तसेच सर्वांना एकत्र पुढे घेऊन जायची क्षमता पुरुषांमध्ये अधिक असते.लिहिण्यासारखं खूप काही आहे. पुरुष समजायला सोप्पा असला तरी पुरुष होणे मात्र सोप्पे नसते. स्वतःचा खिसा रिकामा करून आपल्या वाट्याचा आनंद दुसऱ्याला देणे पुरुषांकडून शिकावे. अपवाद सगळीकडेच असतात. परंतु “All men are Dogs” म्हणत सरसकट सगळ्यांना दूषणं लावणाऱ्या स्त्रियांच्या वडलांबद्दल-भावाबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. स्त्रियांशीवाय जग अपुरं असलं तरी पुरुषांशीवाय ते परिपुर्ण होऊ शकत नाही हेच अंतिम सत्य आहे.आज जागतिक पुरुष दिन आहे तो फार कमी ठिकाणीच प्रत्यक्षात साजरा केला जाईल. पण त्याचं दुःख न बाळगता त्याच्या वाटचा आनंद तो आजही आपल्या लोकांमध्ये वाटून टाकेल आणि स्वतः नामानिराळा राहील यात कोणाला तिळमात्र शंका नाही !