BREAKING NEWS:
हेडलाइन

*जालन्यात ओबीसींचा भव्य मोर्चा* *एक लाखाच्या वरून ओबीसी बांधवांचा सहभाग*

Summary

ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, ओबीसी आरक्षणात इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये, या प्रमुख मागण्यांसह इतर 14 मागण्यांसाठी आज रविवारी विविध पक्षातील ओबीसी नेते पक्ष भेदाभेद विसरून ओबीसींच्या संविधानिक हक्कासाठी जालना येथे एकत्र आले होते. यात प्रामुख्याने ओबीसी मंत्री नामदार […]

ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, ओबीसी आरक्षणात इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये, या प्रमुख मागण्यांसह इतर 14 मागण्यांसाठी आज रविवारी विविध पक्षातील ओबीसी नेते पक्ष भेदाभेद विसरून ओबीसींच्या संविधानिक हक्कासाठी जालना येथे एकत्र आले होते. यात प्रामुख्याने ओबीसी मंत्री नामदार विजय वडेट्टीवार माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री महादेव जानकर , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, राजकीय समन्वयक डॉ. खुषालचन्द्र बोपचे, महासचिव सचिन राजूरकर, प्रकाश अण्णा शेंडगे, समीर भुजबळ, डॉ. विकास महात्मे स्थानिक आमदार व खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चात काठी घोंगडे घेऊन, ढोल-ताशा पथकाच्या तालात, पारंपारिक वेशभूषेत, एक लाखाच्यावर ओबीसी, एन टी/ व्ही जे/ एसबीसी बांधव ओबीसी मोर्चात सामील झाले होते. मोर्चात आता मुख्यमंत्री ओबीसीचाच असे ब्यानर झडकत होते. तसेच आगामी काळात या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
या मोर्चाच्या सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती परंतु नंतर ओबीसी मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनी मोर्च्याला स शर्त परवानगी दिली. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर सगळा ओबीसी समाज एकत्र आहे असा इशारा नामदार विजय वडेट्टीवार यांनी याप्रसंगी दिला, हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही फक्त आमच्या हक्कासाठी आहे असे वक्तव्य त्यांनी याप्रसंगी केले. ओबीसींची स्वतंत्र जनगणना होत नसेल तर मी मुख्यमंत्री आणि मोदी साहेब यांना विनंती करेल. तसेच विधानसभेत स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मांडणार. जोपर्यंत पक्षाच्या पलीकडे लढाई जात नाही तोपर्यंत यश मिळणार नाही असेही वडेट्टीवार याप्रसंगी म्हणाले.

प्रा. शेषराव येलेकर
उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *