जाती व्यवस्थेचे निर्मूलनासाठी म. फुले – डॉ.आंबेडकरांचे योगदान निबंध स्पर्धाचे आयोजन
गडचिरोली प्रतिनिधी
अनुराग शिक्षण ज्ञान व आरोग्य प्रसारक मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन ऑफ नसिऀग अँण्ड हेल्थ सायन्स आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसुर्य म. ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधुन दिनांक ११ एप्रिल २०२१ रोज रविवारला “जातिव्यवस्थेचे निर्मूलनासाठी म. फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन दुपारी १-०० वाजता करण्यात आले आहे.कालावधी १ ते ३ वाजता असुन शब्द मर्यादा १५०० इतकीच राहील.या स्पर्धेत वर्ग ९ ते १२ वी पर्यंत शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी होत येईल. यासाठी नोंदणी शुल्क ३०/- आकारण्यात येणार आहे. जाती व्यवस्थेचे निर्मूलनासाठी
( Annihilation of Cast) म. फुले- डॉ.आंबेडकर यांचे योगदान या विषयावरीलं निबंध स्पर्धा मध्ये शशिकला रुडे स्मृती प्रित्यर्थ डॉ.अनिल रुडे यांचे कडून प्रथम पुरस्कार १०००/ रोख,स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र , तर स्मृतीशेष पुनिराम मेश्राम यांच्या स्मरणार्थ अर्चना उके (क.वि.वासाळा ) यांचे कडून द्वितीय पुरस्कार ७००/ तर तृतीय पुरस्कार ५०० / रोख सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात येणार आहे. तसेच तिन उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी विद्यार्थीना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.सदर निबंध स्पर्धेत कोणत्याही जिल्ह्यातील मुले-मुली सहभागी होवू शकतात.सविस्तर माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन ऑफ नसिऀग अॅंड हेल्थ सायन्स पालोरा रोड ,आरमोरी जिल्हा गडचिरोली भ्रमणध्वनी क्रमांक 9421726778 येथे दि. ७ एप्रिल २०२१ पर्यंत संपर्क साधून नोंदणी करावी.