जगाला राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या विचारांची गरज – युवानेते अब्दुल समीर यांचे प्रतिपादन
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.23, कोरोना संकटामुळे आज संपूर्ण जग हैराण आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी स्वच्छतेला मोठे महत्व देण्यात आले आहे. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी याआधीच आम्हाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. जगातील उदभवलेली परिस्थिती पाहता आज जगाला राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज मंगळवार ( दि.23 ) रोजी शहरातील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अब्दुल समीर बोलत होते.
सिल्लोड नगर परिषद अंतर्गत स्वच्छ व हरित शहर करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. दारापुढे आलेल्या घंटा गाडीत ओला व सुका कचरा वेगळा करूनच टाकावा, शहर कचरामुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार ” मी जबाबदार ” याप्रमाणे प्रत्येकाने वेळोवेळी हात धुणे व काळजीने मास्क वापरून सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे असे आवाहन अब्दुल समीर यांनी याप्रसंगी केले.
यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, नगरसेवक शंकरराव खांडवे, मतीन देशमुख , जितू आरके, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, अकिल देशमुख, माजी नगरसेवक राजेंद्र सिरसाट, संजय आरके, जगनाथ कुदळ, रावसाहेब सिरसाट, दादासेट पंडित, सखाराम आहिरे, राजेश्वर आरके, फहिम पठाण, यांच्यासह सतिष सिरसाट, आनंद पैठणकर, प्रमोद सिरसाट, जीवन सिरसाट, सुनील ठोंबरे, दीपक पैठणकर, संतोष सिरसाट, दीपक क्षीरसागर, विनोद पैठणकर, आनंद सिरसाट, चंद्रकांत ठोंबरे आदिंची उपस्थिती होती.
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड प्रतिनिधी