नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांना आदर्श मानून दिव्यांगांनी प्रेरणा घ्यावी – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

Summary

नागपूर, दि. २१:  स्टिफन  हॉकींग, थॉमस एडीसन, अल्बर्ट आईनस्टाईन या जग प्रसिद्ध शास्ज्ञांनी अपंगात्वावर मात करून नवे शोध लावले. हा आदर्श समोर ठेवून दिव्यांगांनी जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर […]

नागपूर, दि. २१:  स्टिफन  हॉकींग, थॉमस एडीसन, अल्बर्ट आईनस्टाईन या जग प्रसिद्ध शास्ज्ञांनी अपंगात्वावर मात करून नवे शोध लावले. हा आदर्श समोर ठेवून दिव्यांगांनी जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर व राष्ट्रीय दृष्टी दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान, देहरादूनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांना आज स्मार्ट फोन, डेजी प्लेयर, ब्रेल किटचे वाटप करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील जवळपास 350 दिव्यांगांना या साहित्याचे वाटप पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी विमला आर, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सदस्य दिनेश यादव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले, तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळे देशात संगणक व तंत्रज्ञान क्रांती झाली. यामुळे आपल्या प्रत्येकाचे जीवन अधिक सुखकर व सुलभ झाले आहे. दिव्यांगांना जीवन जगताना काही अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु दिव्यांगांनी निराश होऊ नये. जगामध्ये १२ थोर शास्त्रज्ञ हे अपंग होते. स्टिफन हॉकींग, थॉमस एडीसन सारख्या शास्त्रज्ञांनी अंपगत्वावर मात करून अनेक शोध लावले. या शोधांमुळे ते जगप्रसिद्ध झाले. अनेक संगीतकार हे दिव्यांग होते. या व्याधींवर मात करून त्यांनी संगीताच्या क्षेत्रात अनमोल कामगिरी केली आहे. या शास्त्रज्ञ व संगीतकारांपासून सर्व दिव्यांगांनी प्रेरणा घ्यावी. नव्या तंत्रज्ञानांच्या सहाय्याने आपले जीवन अधिक सुलभ करावे, असेही आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, नगरसेवक दिनेश यादव यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासूरकर यांनी केले तर आभार प्रफुल्ल शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *