जागतिक परिचारिका दिन सिल्लोड येथे शिवसेनेच्यावतीने परिचारिकांचा सन्मान
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.12, सिल्लोड येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांना तालुका शिवसेनेच्यावतीने साडी , किरणा किट व जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन सन्मान करण्यात आला. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती . प्रारंभी दिवंगत परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, पैठणचे माजी नगराध्यक्ष जितसिंग करकोटक, वैदयकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, डॉ. मोरे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार,नगरसेवक सलीम हुसेन, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहमद हनिफ, दीपाली भवर, डॉ. दत्ता भवर , मेघा शाह आदिंची उपस्थिती होती.
परिचारिकेचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान हे प्रशंसनीय आहे . कोरोना च्या लढाईत डॉक्टर, पोलीस यांच्यासह परिचारिका एक योद्धा म्हणून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या या संकटात आपण आपल्या घरी सुरक्षितपणे राहतो मात्र परिचारिका आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत. कोरोनाचे संकट असो व दैनंदिन जीवनात परिचरिकांचे योगदान विसरता येणार नाही अशा शब्दांत महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी परिचारिकांच्या कामाचा गौरव केला.
यावेळी शीला सुरडकर, हेमा कोळी,मनीषा गोराडे, सौ. लांडगे, संगीता सोनवणे, ज्योती काकडे, आशा वाघमारे, रेखा डाखोरकर, प्रतिभा कुलकर्णी, माया थोरे,रुपाली जाधव,मनीषा मोगले आदी परिचारिका उपस्थित होत्या.