BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपूर काँग्रेस : प्रकाशाचा अंधार – नानांसमोर उघड : जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक

Summary

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हातील काँग्रेस कमिटीच्या ग्रामीण व शहर काँग्रेसची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे मुरली भाई देवरा भवनात नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. गेल्या सात वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रथमच काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मनोगत […]

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हातील काँग्रेस कमिटीच्या ग्रामीण व शहर काँग्रेसची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे मुरली भाई देवरा भवनात नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.

गेल्या सात वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रथमच काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मनोगत व सूचना ऐकण्यासाठी जिल्हा आढावा बैठक घेण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी मोकळ्या मनाने आपली मनातील खंत व्यक्त केली.

या आढावा बैठकीतील 95% कार्यकर्त्यांनी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या विरोधात गरळ ओकली.

नागभीड तालुक्यातील एका महिला पदाधिकाऱ्यांनी प्रकाश देवतळे हे आपल्याला भाजप नेत्याकडे बळजबरीने राजीनामा देण्यासाठी घेऊन गेल्याची तक्रार सर्वात आधी केली. गेल्या तीन महिने तुरुंगात राहणाऱ्या व पदनियुक्ती नंतर कुठलेही पक्षवाढीसाठी काम न करणाऱ्या ‘ तालुका अध्यक्षाला’ कुठल्या निकषांवर पदावर ठेवण्यात आले याची विचारणा दिनेश चोखारे यांनी केली.

यासह जिल्हापरिषदेच्या गट नेते सतीश वारजूरकर यांनी ही आपली नाराजी व्यक्त केली, या आढावा बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देवतळे यांना सात वर्ष जिल्हाअध्यक्ष पद भूषिविले असून आता या पदावर अन्य कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी अशी आग्रही मागणी नव – नियुक्त प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना केली.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *