गोबरवाही ते बावनथडी रस्ता मृत्यु चे माहेरघर..
राजेश उके
न्युज रिपोर्टर/तुमसर तालुका
आंतरराज्यीय महामार्ग क्रमांक 6 मध्ये तुमसर – कटंगी महामार्गावरील गोबरवाही ते बावनथडी गावापर्यंत जात असतांना जणु मृत्यु ला आमंत्रण देत आहो असा आभास होतो. कित्येक लोकांचे अपघात सुध्दा ह्या रस्त्यावर झाले. ह्या रस्त्यावर मोठमोठी जड वाहणे सुध्दा जात असतात, त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ह्याकडे दुर्लक्ष करीत आहे. चार महिन्यांपूर्वी खेड्यांची कोटींग केली होती, पण खड्डे जसेच्या तसे झाले कारण निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून रूपये कमविले. जनतेकडून आग्रह आहे कि, सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे जेणेकरून मुत्यु टाळता येईल.