*गोंडेगाव येथे ग्रामस्तरीय ग्राम विकास आराखडा प्रशिक्षण संपन्न*
नागपूर कन्हान : – राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत पंचायत समिती पारशिवनी व्दारे गोंडेगाव जि प सर्क ल च्या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्या सह ग्राम विकासास सक्रिय सदस्याचे “आमचं गाव, आमचा विकास ” ध्येय पुर्तीकरिता गोंडेगाव येथे ग्राम स्तरिय ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
पंचायत समिती पारशिवनी व्दारे संकल्प श्रमीक सभागृह गोंडेगाव कॉलोनी येथे मंगळवार (दि.१९) ला बनपुरी प स सदस्य नरेश मेश्राम यांच्या अध्यक्षेत व गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोक रीमारे, टेकाडी सरपंचा सुनिता पृथ्वीराजजी मेश्राम, वराडा सरपंचा विद्याताई दिलीपराव चिखले, साटक सरपंचा सिमाताई यशवंतराव उकुंडे, बनपुरी सरपंच संजय गजभिये, बोरडा सरपंच मनोहरराव डडुरे आदी च्या प्रमुख उपस्थित पं स पारशिवनीचे अधिकारी एस बी कुमरे, मुनिष दुपारे, देशमुख साहेब हयांनी “आमचं गाव, आमचा विकास” ध्येय पुर्ती करिता ग्रामस्तरिय ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन गावक-यांचा व गावाची उन्नती करण्याविषयी यथोचित मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेस जिल्हा परिषद गोंडेगाव सर्कल मधील ग्राम पंचायत सरपंच, सचिव, उपसरपंच, ग्रा प सदस्य, पटवारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कस, बचत गट सदस्य, ग्राम संघ सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहुन ग्रामस्तरीय ग्राम विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घेतला.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535