BREAKING NEWS:
हेडलाइन

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन च्या मागणीला यश: दिवाळीच्या सुट्ट्या मंजूर

Summary

गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठाद्वारे शैक्षणिक सत्र 2020-21 या सत्रामध्ये शैक्षणिक दिनदर्शिकेत दिवाळीच्या सुट्ट्या नमूद कराव्या यासाठी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनने मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून गोंडवाना विद्यापीठाने दिवाळीच्या 10 दिवसाच्या सुट्ट्या मंजूर केलेल्या असून गोंडवाना विद्यापीठाने आजच याबाबतचे […]

गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठाद्वारे शैक्षणिक सत्र 2020-21 या सत्रामध्ये शैक्षणिक दिनदर्शिकेत दिवाळीच्या सुट्ट्या नमूद कराव्या यासाठी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनने मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून गोंडवाना विद्यापीठाने दिवाळीच्या 10 दिवसाच्या सुट्ट्या मंजूर केलेल्या असून गोंडवाना विद्यापीठाने आजच याबाबतचे तात्काळ परिपत्रक काढले आहे.
नागपूर,अमरावती आणि नांदेड येथील विद्यापीठांनी त्यांच्या शैक्षणिक दिनदर्शिके मध्ये दिवाळीच्या सुट्ट्या नमूद केलेल्या आहेत मात्र गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक दिनदर्शिके मध्ये दिवाळी सुट्ट्यांची नोंद नाही ही बाब गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर असोसिएशनच्या शिष्ट मंडळाने कुलगुरूंना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनातून निदर्शनात आणली होती. दि. १५ जून पासुन नवीन सत्राला सुरुवात होऊन विद्यापीठा अंतर्गत सर्वच महाविध्यालयांमध्ये प्राध्यापकांनी सातत्याने हजर राहून सर्व शैक्षणिक कार्य पार पाडले असल्याने त्यांना दिवाळीनिमित्त काही दिवसाच्या सुट्ट्या मिळाव्यात ही सर्वच प्राध्यापकांची मागणी होती. गोंडवाना विद्यापीठातील सर्व प्राध्यापक वर्गाची ही मागणी लक्षात घेता संघटनेने हा प्रश्न लावून धरला होता. आज झालेल्या विद्या परिषद सभेमध्ये संघटनेच्या मागणीची दखल घेण्यात आली असून प्राध्यापकांसाठी दिवाळीच्या सुट्ट्या मंजूर करण्यात आल्या आहेत. संघटनेच्या या शिकशहीताच्या कार्याला यश मिळवून दिल्याबद्दल गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर असोसिएशनचे अभिनंदन आणि आभार मानले आहे.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *