महाराष्ट्र हेडलाइन

गडचिरोली जिल्ह्यात 548 कोरोनामुक्त , 22 मृत्यूसह 431 नवीन कोरोना बाधित

Summary

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम- दिनांक 08 मे. 2021 :- आज जिल्हयात 431 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 548 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 22 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष लाझेडा गडचिरोली, 48 […]

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम-
दिनांक 08 मे. 2021 :-
आज जिल्हयात 431 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 548 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 22 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष लाझेडा गडचिरोली, 48 वर्षीय पुरुष एटापल्ली , 38 वर्षीय महिला कढोली ता.कुरखेडा , 56 वर्षीय पुरुष ता.शिंदेवाही जि.चंद्रपूर , 71 वर्षीय महिला आरेवाडा ता.भामरागड, 78 वर्षीय पुरुष बेलगाव ता.कोरची, 48 वर्षीय पुरुष ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 40 वर्षीय पुरुष अहेरी, 65 वर्षीय पुरुष गडचिरोली, 36 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, 60 वर्षीय पुरुष आष्टी ता.चामोर्शी, 75 वर्षीय महिला कुरखेडा, 57 वर्षीय पुरुष आरमोरी, 57 वर्षीय पुरुष गडचिरोली, 45 वर्षीय महिला सिरोंचा, 75 वर्षीय पुरुष वडसा, 68 वर्षीय पुरुष सिरोंचा, 68 वर्षीय पुरुष कोटगल गडचिरोली, 75 वर्षीय महिला वसंतपूर ता.मुलचेरा, 69 वर्षीय पुरुष एटापल्ली, 60 वर्षीय पुरुष अहेरी, 65 वर्षीय महिला धानोरा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 431 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 106, अहेरी तालुक्यातील 70, आरमोरी 66, भामरागड तालुक्यातील 09, चामोर्शी तालुक्यातील 36, धानोरा तालुक्यातील 12, एटापल्ली तालुक्यातील 27, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 23, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 25 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 46जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 558 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 132, अहेरी 56, आरमोरी 38, भामरागड 14, चामोर्शी 72, धानोरा 17, एटापल्ली 48, मुलचेरा 26, सिरोंचा 28, कोरची 10, कुरखेडा 58 तसेच वडसा येथील 52 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *