महाराष्ट्र हेडलाइन

गडचिरोली जिल्ह्यात 260 कोरोनामुक्त, 13 मृत्यूसह 180 नवीन कोरोना बाधित

Summary

गडचिरोली,(विभागीय प्रतिनिधी)दि.22*: आज जिल्हयात 180 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 260 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28542 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26017 वर पोहचली. तसेच सद्या 1842 सक्रिय कोरोना बाधितांवर […]

गडचिरोली,(विभागीय प्रतिनिधी)दि.22*: आज जिल्हयात 180 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 260 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28542 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26017 वर पोहचली. तसेच सद्या 1842 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 683 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 13 नवीन मृत्यूमध्ये 43 वर्षीय पुरुष जाफराबाद ता. सिंरोचा, 48 वर्षीय पुरुष घोट ता. चामोर्शी, 45 वर्षीय पुरुष मुर्झा ता.गडचिरोली,60 वर्षीय पुरुष ता. ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर, 39 वर्षीय पुरुष लगाम ता. मुलचेरा, 53 वर्षीय महिला आरमोरी , 65 वर्षीय महिला इंदीरा नगर गडचिरोली, 75 वर्षीय पुरुष चींनगाव ता. कुरखेडा , 32 वर्षीय पुरुष विठ्ठलपुर ता. चामोर्शी, 62 वर्षीय महिला कोरेगाव ता. वडसा, 62 वर्षीय महिला कोतुर ता.अहेरी ,40 वर्षीय पुरुष सोनसरी ता. कुरखेडा, 55 वर्षीय महिला गोविंदपुर ता. मुलचेरा याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.15 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.45 टक्के तर मृत्यू दर 2.39 टक्के झाला.
नवीन 180 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 41, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी 14, भामरागड तालुक्यातील 08, चामोर्शी तालुक्यातील 30, धानोरा तालुक्यातील 08, एटापल्ली तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 7, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 21, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 31 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 04 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 260 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 72, अहेरी 14, आरमोरी 14, भामरागड 04, चामोर्शी 52, धानोरा 19, एटापल्ली11, मुलचेरा 17, सिरोंचा 16, कोरची 07, कुरखेडा 14 तसेच वडसा येथील 20 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *