गडचिरोली जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनमुक्त जास्त . आरोग्य विभागाचे युद्ध पातळीवर उपचार कार्य सुरू. 627 कोरोनामुक्त 17 मृत्यूसह 516 नवीन कोरोना बाधित
गडचिरोली, चक्रधर मेश्राम विभागीय प्रतिनिधी दि.04 मे २०२१ :-
आज जिल्हयात 516 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 627 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 17 नवीन मृत्यूमध्ये 36 वर्षीय पुरुष रामकृष्णपूर ता.चामोर्शी, 51 वर्षीय पुरुष जोगीसाखरा ता.आरमोरी , 68 वर्षीय महिला गडचिरोली , 38 वर्षीय पुरुष ता.अहेरी, 58 वर्षीय पुरुष ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर , 61 वर्षीय महिला अहेरी, 66 वर्षीय महिला वाघाडा बर्डी ता.आरमोरी, 40 वर्षीय पुरुष उमरी ता.चामोर्शी , 48 वर्षीय महिला गडचिरोली, 75 वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली, 55 वर्षीय पुरुष विवेकानंद नगर गडचिरोली, 73 वर्षीय पुरुष सर्वोदय वार्ड गडचिरोली, 53 वर्षीय पुरुष आरमोरी, 75 वर्षीय पुरुष गडचिरोली,65 वर्षीय पुरुष वनश्री कॉलोनी नवेगाव गडचिरोली,65 वर्षीय पुरुष कुरुड ता.वडसा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 516 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 177, अहेरी तालुक्यातील 58, आरमोरी 30, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 42, धानोरा तालुक्यातील 26, एटापल्ली तालुक्यातील 36, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 31, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 22, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 19 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 59 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 627 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 222, अहेरी 66, आरमोरी 45, भामरागड 18, चामोर्शी 61, धानोरा 04, एटापल्ली 26, मुलचेरा 10, सिरोंचा 26, कोरची 38, कुरखेडा 21, तसेच वडसा येथील 90 जणांचा समावेश आहे.