महाराष्ट्र हेडलाइन

खाजगी हॉस्पिटलचें कत्तलखाने तात्काळ बंद करा…बाबा रामटेके यांचे मत.

Summary

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १४ एप्रिल २०२१ सर्व हॉस्पिटल सरकारने ताब्यात घेऊन सर्वांना मोफत उपचार सुरु करा. आता तरी नागरिकांनो पेटून उठा. करोनाच्या महामारीत मृत्युंचे तांडव सुरु असताना सरकारी यंत्रणा कोणाची वाट पहात आहे. एकाच घरातले सर्व लोक करोनाने […]

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १४ एप्रिल २०२१
सर्व हॉस्पिटल सरकारने ताब्यात घेऊन सर्वांना मोफत उपचार सुरु करा.
आता तरी नागरिकांनो पेटून उठा.
करोनाच्या महामारीत मृत्युंचे तांडव सुरु असताना सरकारी यंत्रणा कोणाची वाट पहात आहे.
एकाच घरातले सर्व लोक करोनाने बाधित होत आहेत. लोक मृत्यू मुखी पडत आहेत.घरातले कोण मृत्यू मुखी पडले. एकमेकांना काही माहिती पडत नाही.फिल्ड वर कामकरणारे पत्रकार जात आहेत.पत्रकार अमित जंगमचे वडील गेले त्याला माहिती नाही. आणि तो आज गेला.

अश्या भयानक करोना महामारीत खाजगी हॉस्पिटलचें कत्तलखाने राज रोस सुरु आहेत. पेशंटच्या पोटात अन्न नाही पण हजारो रुपयाची औषधं दिली जातात. जर करोनावर औषधं नाही तर मग ही औषधं का दिली जातात. साठ सत्तर टक्के लंग्ज इफेक्ट असताना सरकारी हॉस्पिटल मध्ये करोना ग्रस्त वाचतो. आणि खाजगी हॉस्पिटल मध्ये हजारो रुपयांची औषधं देऊन पेशंट मरतो तो कसा????

सरकार अजून बघत बसलंय. किती लोकांचे बळी घेणार आहात? सर्व पक्ष, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांनी आता रस्त्यावर उतरले पाहिजे. गरीब असो वा श्रीमंत सर्वांना समान ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. विहार
मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च यांनी आता तरी आपला सर्व खजिना या महामारी साठी द्यावा. अरे भक्त जिवंत राहतील तर तुमचा देव जिवंत राहील. तुम्ही कोणाची वाट बघता. तुमचा मुका बहिरा देव तुम्हांला आदेश देणार नाही.
किती सहन कराल. आता तरी लढायला उतारा. वेळ प्रत्येकावर येणार आहे.
खाजगी हास्पिटल सरकारने तात्काळ ताब्यात घ्यावी आणि ही कत्तलखाने बंद करावीत. शहरांत चौक्का चौकात गरम काढे लोकांना द्या.हळद टाकलेले दूध मोफत द्या.गरम चहा द्या.चांगले जेवण द्या. व्हिट्यामिनच्या गोळ्या द्या.पाहिजे ती औषधं द्या.पण मायबापहो लोकांचे जीव वाचवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *