कोविड रुग्णांना बेडची व्यवस्था करुन द्या:-पालकमंत्री विश्वजीत कदम
Summary
*पोलीस योध्दा न्युज*विशेष वार्ता:-भंडारा जिल्हात कोविड -19ची संख्या वाढत असुन मृत्यूंचा दर वाढत आहे, रुग्णांच्या उपचारासाठी बेडची व्यवस्था कमी पडत असुन रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यात यावे असे निर्देश भंडारा जिल्ह्यातील पालकमंत्री माननीय विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला दिले. जिल्हापरिषद […]
*पोलीस योध्दा न्युज*विशेष वार्ता:-भंडारा जिल्हात कोविड -19ची संख्या वाढत असुन मृत्यूंचा दर वाढत आहे, रुग्णांच्या उपचारासाठी बेडची व्यवस्था कमी पडत असुन रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यात यावे असे निर्देश भंडारा जिल्ह्यातील पालकमंत्री माननीय विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हापरिषद सभाग्रुहात आयोजित बैठकीत कोविड-19ची आढावा बैठक घेतांना बोलत होते.
यावेळी आमदार राजुभाऊ कारेमोरे,आ.अभिजित वंजारी,आ.नरेन्द्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदिप कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनीकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शेखर नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत उईके व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ह्यावेळी आमदारांनी विविध कोविड विषयावर समस्या पालकमंत्री यांना सांगीतल्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी संदिप कदम यांनी समस्या च्या उपाययोजना सुचविल्या,व कोणत्या ही रुग्णांची तात्काळ व्यवस्था चे आश्वासन दिले.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259