महाराष्ट्र हेडलाइन

कोरोना व्हायरस;  प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेकडून उपाययोजना सुरू  निर्जंतुकीकरणासाठी शहरात सोडीयम हायपोक्लोराईड ची फवारणी युवानेते अब्दुल समीर यांच्याहस्ते शुभारंभ

Summary

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.12, देशासह राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पहायला मिळत आहे. दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्याअनुषंगाने महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार कोरोनाचा पुढील धोका रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने शहरात […]

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.12, देशासह राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पहायला मिळत आहे. दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्याअनुषंगाने महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार कोरोनाचा पुढील धोका रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने शहरात निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराइड फवारणी तसेच कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी हात धुणे, मास्क चा वापर करणे, सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगरसेवक सुधाकर पाटील, शंकरराव खांडवे, मनोज झंवर, जितेंद्र आरके,रईस पठाण, मुख्याधिकारी सय्यद रफिक,आदींची उपस्थिती होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या सूचना व नियम लागू केले आहेत. याचे प्रत्येक नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे . नाहक होणारी गर्दी टाळून नागरिकांनी हात धुणे,मास्क वापरणे, सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे या त्रिसूत्री चे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन अब्दुल समीर यांनी केले आहे.

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड
प्रतिनिधी
शेख चांद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *