कोरोना लॉकडाऊनमध्ये योद्धाची भूमिका बजावत असलेल्या सीएसटीपीएस विद्युत कामगारांचा गौरव
Summary
—————————————-जागतिक (कोव्हिड१९) कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण आपल्या घरात कैद झाला होता त्यावेळी आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा सक्रीय होते त्याच काळात विजनिर्माण क्षेत्रातील कामगार,कंत्राटी कामगार,अधिकारी त्याच आत्मविश्वासाने ह्याचा सामान करीत होते. आशियातील सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र सीएसटीपीएसचे […]

—————————————-जागतिक (कोव्हिड१९) कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण आपल्या घरात कैद झाला होता त्यावेळी आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा सक्रीय होते त्याच काळात विजनिर्माण क्षेत्रातील कामगार,कंत्राटी कामगार,अधिकारी त्याच आत्मविश्वासाने ह्याचा सामान करीत होते. आशियातील सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र सीएसटीपीएसचे अधिकारी या(कोव्हिड१९) महामारीच्या संकटात लॉकडाऊन दरम्यान जनतेला त्रास देऊ नये म्हणून दिवसरात्र व्यस्त आहेत. लॉकडाऊनमध्ये वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी सामाजिक दायित्व सांभाळत योद्ध्यांची भूमिका निभावत आहेत.
मोठ्या संख्येने वीज कर्मचारी विद्युत कार्यालये आणि विद्युत केंद्रांमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये अभियंते,तंत्रज्ञ ते ऑपरेटर आणि अधिकारी यांचा समावेश आहे. वीज पुरवठा निरंतर सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी व ग्रामीण भागात, शहरात,कॉलनीमध्ये राहणा-या कुटुंबांना, वीज कामगार आणि वेगवेगळ्या कामगार संघटना व कोरोना कंट्रोल टिम सुरक्षा पुरविण्यासाठी सुरक्षा पुरवित होते. सुरक्षा रक्षक देखील योद्धाप्रमाणे काम करीत आहेत, या काळात वीज बिघाड आणि ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार नाही याची काळजी घेतली.
कोरोनाच्या लॉकडाउन कालावधीत मोठ्या संख्येने कामगार पॉवर स्टेशनमध्ये आणि आँफिस मध्ये कार्यरत आहेत.
आणि त्यांच्या मेहनतीमुळे या काळात वीजपुरवठा सामान्य राहिला आहे. जोखीम आणि सुरक्षितता पाळत CSTPS च्या प्रत्येक विभागात आणि मुख्य अभियंता कार्यालयात लॉकडाऊनमध्ये दैनंदिन
काम करत आहेत. सर्व विभागांमध्ये विभाग प्रमुख व अभियंता, तंत्रज्ञ यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बॉयलर मेंटेनन्स, टर्बाइन मेन्टेनन्स, इलेक्ट्रिक मेंटेनन्स, वॉटर प्रोसेसिंग डिपार्टमेंटमध्येही यंत्रांची नियमितपणे देखभाल केली जात आहे जेणेकरून या काळात पुरवठा खंडित होऊ नये. लॉकडाऊनमुळे आजकाल लोक घरी आहेत, त्यामुळे विजेची मोठी गरज आहे. पॉवर स्टेशनचे मुख्य अभियंता व त्यांचे सहकारी टिम यांनी मुख्यालय, मुंबई येथून वेळोवेळी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी तत्पर होते विजेची गरज लक्षात घेता वीजपुरवठा निरंतर सुरू ठेवण्याची व्यवस्था केली गेली आहे. (सीआयएसएफ, सिक्युरिटी) सुरक्षा व्यवस्था दिवसरात्र आपली कर्तव्ये पार पाडत आहे. अशा कोव्हिड योद्धाचे मनोबल वाढविण्यासाठी, आमच्या जूर्म के खिलाफ आवाज पोलीस योद्धा न्युज पोर्टलच्या वतीने पोर्टलचे मुख्य संपादक राजकुमार खोब्रागडे यांनी हस्ते रात्रंदिवस सीएसटीपीएस
वीज निर्मिती केंद्रात कर्तव्य पार पाडणा-यांना सुरक्षा पहारेकरी
१) बि.डी.शेंडे
२) बि.के.त्रिशुले
३) साबीर शेख
४) पी.जे.पांडे
५) एस.जे.दाशरवार
यांना गौरविण्यात आले.