कोरोना च्या निमित्ताने देवाच्या साम्राज्य विरुद्ध युद्ध छेडले पाहिजे… श्रीधर गुडघे यांनी संजय राऊत यांच्या कडे व्यक्त केली प्रतिक्रिया
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १८ एप्रिल २०२१
संजय राऊत यांना पाठवलेला हा लेख सर्व बहुजन बांधवांनी काळजीपूर्वक वाचावा व त्यातून बोध घेऊन हिंदू उर्फ ब्राह्मणी धर्माचा त्वरित त्याग करून लोक कल्याणकारी साऱ्या जगातील महान विचारवंतांनी गौरविलेला तसेच मान्यवर भारतीय महान विचारवंत कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरूजी, महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे साहेब, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रकांड पंडित डाॅ. आ.ह.साळुंखे सर, प्रा. मा.म. देशमुख सर यांच्यासारख्या महान दिग्गज नेत्यांनी गौरविलेला बुद्ध धम्म स्वीकारावा ही आग्रहपूर्वक – प्रेमपूर्वक कळकळीची नम्र विनंती ! संजय राऊतजी, आपले अभिनंदन !कालच्या ‘सामना’ मध्ये ब्राह्मण्यावर आपण केलेला हल्ला खूपच महत्त्वाचा आहे. प्रबोधनकारांच्या लेखणीची आठवण करून देणारा हा लेख आहे. केवळ हिंदुंचेच नव्हे तर सर्वच धर्माच्या देवांनी भक्तांना करोना वर सोडले आहे. त्यात नवीन काहीच नाही. जेव्हा जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा तेव्हा देव गायबच असतो. आपण जाणत असालच की देव ही एक कपोलकल्पित कथा कल्पना आहे. लोकांना गुलाम बनविण्यासाठी प्रत्येक धर्माच्या पुरोहितांनी म्हणजेच भटब्राम्हणांनी देव नावाचा VIRUS निर्माण केला. याचीच भिती दाखवून हजारो पिढ्यांना या सर्व भटब्राम्हणांनी छळले आणि लुटले. माणसाचं शारीरिक, बौध्दिक, मानसिक शोषण केले. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, न्यायिक, राजकीय अशा सर्व प्रकारे माणूस कंगाल झाला. यात मानसिक व बौध्दिक गुलामी सर्वात भयंकर असते. तिच्यामुळे बरं वाईट समजण्याची सद्सदविवेक शक्तीच नष्ट होते. आपण काय करीत आहोत हे समजण्याचा सारासार विवेक माणसाला राहत नाही. व्यक्तीचे नैतिक अधःपतन होते. माणूस गतीहीन होतो. अशा माणसांची निर्मिती झाली की सारा समाज विवेकहिन, शीलहिन, गतीहिन होतो. भटब्राम्हणांनी हजारो वर्षे हेच काम केले आहे. त्यांच्या या दुष्ट, देशद्रोही कारस्थानात त्यांना देव नावाच्या VIRUS चा खूपच मोठा फायदा झाला आहे.
माणसांना गुलामगिरीत कायम गाडून ठेवण्यासाठी भट ब्राम्हणांनी देव, दैव, नशीब, आत्मा, परमात्मा, पूर्वजन्म, पूनर्जन्म, ज्योतिषशास्त्र, स्वर्ग- नरक,पाप-पुण्य अशा कितीतरी भंपक कथा, पुराणे,काव्ये, महाकाव्ये रचली. या सर्वांचा धंदा सुरू केला. भांडवल गुंतवणुकीची काहीच गरज नाही. फक्त खोटं रेटून बोलता आले पाहिजे. आणि स्वजातीच्या म्हणजे भटब्राम्हणांच्या कल्याणासाठी काहीही करायची तयारी असली पाहिजे.
आपल्याला ठाऊक आहे की गाईला तर पवित्र मानून लोकांच्या डोक्यात बसवलेच! पण एवढ्यावर थांबतील तर ते भटब्राम्हण कसले?त्यांनी अभक्ष असे गायीचे शेण व मूत सुध्दा गुलामांच्या तोंडात घातले. आणि गंमत तर पुढेच आहे. भटब्राम्हणांनी या गुलामांना त्यांच्या गुलामगिरीचा कैफ येण्यासाठी वर्षाचे 365 दिवस सण नावाचे उत्सव साजरे करण्याचे SOFTWARE त्यांच्या डोक्यात टाकले आहे. आणि या प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगी प्रत्येक दिवशी भटब्राम्हणाला दक्षिणा या नावाने उत्पन्न मिळेल याची कायमची सोय लावलीय ! या धंद्यात मेरीटची आवश्यकता नाही. फक्त जन्माने भट – ब्राम्हण असला की झाले !
या सांस्कृतिक व सामाजिक आतंकवादाला भटब्राम्हणांनी धर्म म्हटलं आहे. हा धर्म अपरिवर्तनीय आहे असेही ठासून सांगितले आहे. कारण की तो म्हणे देवाने बनवला आहे. आणि देवाचे स्थान काय ?सर्वश्रेष्ठ ? मुळीच नाही ! तुमच्या अख्ख्या आयुष्याचं बरं वाईट ठरवणारा हा देव तुमच्या साठी असेलही सर्वश्रेष्ठ. पण भटब्राम्हणांसाठी तो सर्वश्रेष्ठ बिल्कुल नाही. पुढिल संस्कृत श्लोक पहा…
देवाधिनं जगत् सर्वम् , मंत्राधिनंच दैवतम् । ते मंत्राः ब्राह्मणाधिनं, ब्राह्मणो मम दैवतम् ॥ स्पष्ट आहे की सर्व जग देवाच्या स्वाधीन आहे; ते देव मंत्रांच्या स्वाधीन आहेत. ते मंत्र ब्राह्मणांच्या स्वाधीन आहेत. म्हणून देव आणि अख्ख्या जगाचे ब्राह्मण हेच गुरू आहेत. हाच तो ब्राह्मणी गोलमाल ! हीच ती बौध्दिक भ्रष्टता ! हे या भटब्राम्हणांचे अगाध ज्ञान आणि तथाकथित तत्वज्ञान ! याच बौध्दिक बदफैलीमुळे या भटजी ब्राम्हणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला, शूद्रांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही असे ऐकवले,शाहु महाराजांसाठीही वेदमंत्र म्हणण्यास नकार दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढणा-या क्रांतीबा जोतिबा फुले यांचा अपमान केला. छत्रपतींच्या समाधीवरील फुले पायांनी तुडवीली. मुलींसाठी शाळा काढली म्हणून जोतिबांच्या व त्या शाळेत शिकवतात म्हणून सावित्रीमाई वर शेणाचा मारा केला. पुढे पुण्यामध्ये याच भटगीरी करणा-या ब्राह्मणांनी ब्राह्मणी धर्माची कठोर चिकित्सा करणा-या प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरही हल्ला केला आणि त्यांचे जगणे मुश्किल केले.
ज्या देवाच्या नावाने या देशात भटब्राम्हणांनी एवढे घोटाळे करण्याचा देशद्रोह केला त्या देवाला पूर्णपणे नाकारण्याची वेळ आता आली आहे. त्याशिवाय भारतीय माणूस त्याचे ब्राह्मणी धर्मामुळे नष्ट झालेले शारिरीक, बौध्दिक व मानसिक स्वातंत्र्य आणि हरवलेली अस्मिता पुन्हा प्राप्त करू शकणार नाही.आपण आता हा संघर्ष सुरु केलाच आहे तर तो पूर्ण तडीस न्याल ही अपेक्षा. मानवमुक्तीच्या या लढाईत आम्ही आपल्या सोबत असू. एक मुद्दा स्पष्ट करून थांबतो. बुद्ध हा देव नाही. बुद्धाने स्वतः ही गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगितली आहे की, मीही तुमच्या सारखाच मायेच्या गर्भातून जन्म घेतलाय. आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी निर्माण केलेल्या भिक्खु संघातही बुद्धाने स्वतःसाठी खास स्थान निर्माण केले नाही. बुद्धाने स्वतःला मोक्षदाता म्हटलेले नाही. मार्गदाता म्हटलेले आहे. व्यक्ती, समाज, राष्ट्र व जग यांच्या न्यायपूर्ण पुनर्रचनेचे क्रांतीरसायन बुद्ध देतो. बुद्धाचे तत्वज्ञान हे वर्ण-जात वर्गविहीन आणि न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधूत्व यांच्या पायावर व्यक्ती व समाज यांची पुनर्रचना करण्याचे प्रतिपादन करते. कोरोनाच्या निमित्ताने देवाच्या साम्राज्याविरुद्ध आपण युद्ध छेडलेच आहे तर मग वैचारिक युद्ध सामग्रीसाठी सर्वच मान्यवर प्रबोधनकारांचे साहित्य वाचलेच पाहिजे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही ! मेल्यानंतर आपण कोणालाच मेसेज पाठऊ शकत नाही. उलट मेलेल्या माणसाचा मेसेज आपल्याला पाठवावा लागतो.
श्रिधर पुं.गुडधे .आर.पि.आय.