BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

कोरोना चा धोका …. लहान मुलांची काळजी घेण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचा टाॅस्कफोसऀ तयार करणार…:- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे .

Summary

मुंबई, विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021:- कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी […]

मुंबई, विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021:- कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. त्यातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केला जाईल, असे श्री. टोपे यांनी सांगितले. या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करेल.

रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील गुरूवारी रात्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला. महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला म्हणावा तसा वेग आला नाही, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *