BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

कोरोना उपचारासाठी आता रुग्णांना कडून कोणताही फी आकारली जाणार नाही

Summary

वर्धा :- महाराष्ट्रामधील सर्व नागरिकासाठी वीस पॅकेजेस या योजनेअंतर्गत कोविड 19 चा रुग्णांच्या उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची सौम्य लक्षण किंवा कोणतीही  लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही .अश्या  रुग्णांच्या […]

वर्धा :- महाराष्ट्रामधील सर्व नागरिकासाठी वीस पॅकेजेस या योजनेअंतर्गत कोविड 19 चा रुग्णांच्या उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची सौम्य लक्षण किंवा कोणतीही  लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही .अश्या  रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी कमीत कमी खर्च व्हावा साठी ७०० रुपये प्रति दिवस खर्च ठरविण्यात आला होता. परंतु आता कोरोना उपचारासाठी रुग्णांकडून काहीही पैसे घेतले जाणार नाहीत असा महत्वपूर्ण आदेश जिल्हाधिकारी विवेक भिमानवार यांनी दिला आहे                 जिल्यात कोविड १९ महामारी सदृश्य स्तिथी असल्याने बरेचसे कोरोना रुग्ण कस्तुरबा गांधी हॉस्पिटल , सेवाग्राम व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय , सावंगी( मेघे )येथे भरती करण्यात येतात. राज्यशासनाने कोरोना प्रदूर्भावाचा पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना  चा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुगणालाय मार्फत उपलब्ध करून दिला आहे.          जिल्ह्यातील सेवाग्राम आणि सावंगी ही दोन रुग्णालय ही योजना राबविण्यास पात्र आहे.या योजनेचा लाभ घेण्याकरिता उत्पनाचे कोणतीही अट नाही केवळ नागरिक हा महाराष्ट्रचा रहिवासी असावा. तथापि, कोरोन ची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही अश्या रुग्णांसंदर्भात आकारण्यात येणारा खर्च हा संबंधित रुग्णां कडून घेतला जातो. यासाठी वर्धा जिल्ह्यात अश्या लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णासाठी प्रति दिवस ७०० रुपये दर ठरविण्यात आले होते. मात्र शासनाने रुग्णावर आर्थिक बोझा पडू नये यासाठी अवलंबीलेल्या धोरण अंतर्गत रुग्णालयाला जेवण तपासणी, औषधी ,उपचार,इत्यादी सुविधासाठी आपत्ती व्यवस्थापन मधून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सेवाग्राम व सावंगी मेघे हे दोन्ही रुग्णालय  शासकीय कोविड रुग्णालय म्हणून अधिग्रहित केलेले आहे.शासनाच्या निर्देशा नुसार या रुग्णालयालतील कोरोना उपचार संदर्भात सर्व खर्च भागवण्या संदर्भात राज्य शासनाचे निर्देश आहे.        त्यामुळे जिल्हाधिकारी महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत येणाऱ्या पॅकेजेस मध्ये ज्या कोरोना बाधित रुग्णांना लाभ मिळू शकत नाही , त्या रुग्णांना करिता शासकीय दरानुसार रुग्णांवर झालेला खर्च आता जिल्हाशासन देईल. शासकीय दरा प्रमाणे यामध्ये जेवण , औषधी व इतर उपचार यांचा समावेश राहील.दोन्ही रुग्णालयाने रुग्णांकडून उपचार,औषधी व तपासणी साठी कोणते ही शुल्क आकारू नये असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.परंतु ,खाजगी खोली मधील रुग्णांकरीत व वर्धा जिल्ह्याच्या बाहेरील रुग्णां करीत तसेच महात्मा ज्योतिब फुले जण आरोग्य योजनेतील पात्र रुग्णां करीता सदर निधी मिळणार नाही असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
राहुल भोयर

 वर्धा जिल्हा प्रतिनिधी

9975409640

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *