BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जि. प. सीईओ मंगेश गोंदावले यांचा संयुक्त दौरा नागरिकांनी मास्क व गर्दी करणे टाळावी ; तर सरकारी यंत्रणेने सज्ज राहण्याचे दिले निर्देश

Summary

सिल्लोड ( पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क शेख)प्रतिनिधी ) दि.27, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाला रोखण्यासाठी तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावे तेसेच गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी सोबतच कोरोनाचे पुढील संकट पाहता सरकारी यंत्रणेने सज्ज रहावे […]

सिल्लोड ( पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क शेख)प्रतिनिधी ) दि.27, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाला रोखण्यासाठी तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावे तेसेच गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी सोबतच कोरोनाचे पुढील संकट पाहता सरकारी यंत्रणेने सज्ज रहावे असे निर्देश राज्याचे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

देश व राज्यात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. कोरोनाचा पुढील धोका लक्षात घेता तसेच यासंकटावर मात करण्याच्या नियोजणार्थ सिल्लोड शहर तसेच ग्रामीण भागात ना. अब्दुल सत्तार , डॉ. गोंदावले यांनी दौरा केला. यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी संतोष कवडे, समाज कल्याण अधिकारी शिवराज कवडे, यूएनडीचे स्वप्नीक सरदार आदिंची उपस्थिती होती.

सिल्लोड शहर व तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असल्याने यावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सिल्लोड नगर परिषद यांचे सहकार्य घ्यावे नगर परिषद व आरोग्य विभागाने संयुक्त काम केल्यास परस्परांना मदत होईल असे ना. अब्दुल सत्तार यांनी स्पष्ठ केले. ग्रामीण भागात कोरोना रोखणे व प्रसंगी लागन झालेल्या रुग्णांना शोधून त्यांना लवकर उपचार कसा मिळेल यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांची प्राथमिक जबाबदारी आहे. शहरातील दुर्गामाता मंगल कार्यालय व इतर ठिकाणी असलेले पूर्वीचे कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करा. सध्याची परिस्थिती पाहता किमान दोनशे जणांची शहरात टेस्टिंग झाली पाहिजे या पद्धतीने नियोजन करा असे निर्देश ना. अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी अधिकाऱ्यांना दिले.
———————————————–

राज्य सरकारने शहर व ग्रामीण भागात पर्यावरण संतुलन रहावे तसेच गाव हरित सुंदर रहावे यासाठी माझे गाव सुंदर गाव तसेच माझी वसुंधरा यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. पूर्वीच्या झाडांचे पोषण करा तसेच नवीन झाडे लागवड करा सोबतच गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी वरील अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी विविध गावात केले.
———————-
या दरम्यान सिल्लोड येथील सुरू असलेल्या कोविड सेंटर कामाचा ना. अब्दुल सत्तार यांनी आढावा घेतला. कोविड सेंटर चे काम लवकर करण्यासाठी काम गतिमान करा अशा सूचना ना. अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *