*कोरोनाच्या लढ्यासाठी औषध, इंजेक्शन, व्हॅटींलेटरचा पुरवठा करा*:–खासदार प्रफुल्ल भाई पटेल
Summary
*पोलीस योध्दा न्युज* विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना संसर्गाशी लढा उभारताना उपचारात्मक उपाययोजना कमी पडत आहेत. गोंदिया – भंडारा जिल्हृयात औषध, रेनडेमशिवर इंजेक्शन, व्हॅटींलेटर आदिंचा […]
*पोलीस योध्दा न्युज* विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना संसर्गाशी लढा उभारताना उपचारात्मक उपाययोजना कमी पडत आहेत. गोंदिया – भंडारा जिल्हृयात औषध, रेनडेमशिवर इंजेक्शन, व्हॅटींलेटर आदिंचा तुटवडा भासत असल्याने रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. यामुळे राज्य शासनाने पर्याप्त प्रमाणात उपाययोजनात्मक औषध व साहित्यांचा पुरवठा करावा, असे निवेदन खा.प्रफुुल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांना केले आहे.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख झपाट्याने वाढत चालला आहे. वाढत्या रूग्णांमुळे शासकीय व खासगी रूग्णालयावरील ताण वाढत चालला आहे. कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी वेळीच आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील रूग्णालयात तसेच तालुक्यातील रूग्णालयात औषध, ऑक्सीजन सिलिंडर, व्हॅटींलेटर, रेनडेमशिवर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणेसह रूग्णांची तारांबळ उडत आहे. यासाठी राज्य शासनाकडून त्वरित उपाययोजनात्मक औषध व इतर बाबींचा पुरवठा उपलब्ध करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करावे, अशा मागणीचे निवेदन खा.प्रफुल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांना केले आहे.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259