महाराष्ट्र हेडलाइन

कोरोनाचे काळात बेशिस्त वागलात तर… विनाश अटळ आहे? तरीही राजकारण्यांचे दौरे??

Summary

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १६ एप्रिल २०२१ महाराष्ट्रातील तमाम वैद्यकीय क्षेत्र(वार्डबॅाय,मावशी,RMO,consultant, ambulance driver,lab technician etc) कोरोनाशी २४ तास जो एकजुटीने लढा देत आहेत,तीच इच्छाशक्ती सर्व राजकीय पक्षीय नेते व AC मधे बसुन कारभार करणारे आणि बेशिस्त वावरणारे समाजातील काही […]

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १६ एप्रिल २०२१
महाराष्ट्रातील तमाम वैद्यकीय क्षेत्र(वार्डबॅाय,मावशी,RMO,consultant, ambulance driver,lab technician etc) कोरोनाशी २४ तास जो एकजुटीने लढा देत आहेत,तीच इच्छाशक्ती सर्व राजकीय पक्षीय नेते व AC मधे बसुन कारभार करणारे आणि बेशिस्त वावरणारे समाजातील काही कारटयांनी दाखवली तर कोविड ला सहज हरवतां येईल…नाही तर आपला विनाश अटळ आहे . घराघरात मृत्युचे थैमान सुरु झाले तर..विनाश अटळ आहे..
२४ तास काम करणाऱ्या डॅाक्टरांना जे भयावह चित्र दिसतंय ते समाजाला , राजकारण्यांना ,बाबुना का कळत नाही. दिवसभरात येणारे व दिवसागणिक वाढत जाणारे बेड साठीचे call..मन सुन्न करतायेत रोज..? कुणा कुणाला वाचवायचा प्रयत्न करायचा आरोग्य विभागात काम करत असलेल्या त्या योध्दांनी.
कुणाचा मुलगा..कुणाचा बाप..कुणाचा नवरा..कुणाचे आजी आजोबा..कसं वाचवायचे आणि कसं मृत्यू शी दोन हात द्यायचे..?? हातात गंजलेल्या बंदुका घेवुन..Oxygen आहे तर remdesivir नाही..ventilator आहे तर oxygen नाही..गरज लागली तर Toci नाही..
नातेवाईकांच्या डोळ्यातले अश्रु दिसतात पण रडता येत नाही..कीती ते खोटं बोलुन धीर द्यायचा की तुमचा पेशंट बरा होईल..आपण प्रयत्न करु..हे माहीत असताना की त्यांचा पेशंट वाचनार नाही…
एवडी प्रचंड हतबलता आणि निराशेच्या वातावरणात पुन्हा रोज सकाळी उठून दिवसभर कोविड शी दोन हात करायचे..घरातून निघताना पुन्हा तोच युध्दाचा आवेश आणायचा..निघताना लेकी विचारतात..पप्पा घरी कधी येणार..पुन्हा तेच खोटं उत्तर..बाळा आज लवकर येतो..त्यांना कुठे कळते की त्यांचा पप्पा कुणाच्या तरी पप्पाला किंवा मम्माला वाचवण्यासाठी दिवसभर शर्थीचे प्रयत्न करतोय..कुठे गेलीय समाजाची संवेदना..जगण्याच्या शर्यतीत ..भावना मरुन गेल्या आहेत का सर्वांच्या..?
देशांतील जनता किड्या मुंग्या सारखी या कोरोना मधी भरडली जात असताना कशाला हव्यात निवडणुका..? लाखोंची गर्दी जमवणारे देशांचे नेतृत्व इतके कसे गेंड्याचे कातड्यासारखं जालंय की जनता Oxygen,injection,ICU bed विना मरतेय,रस्त्यात ambulance मधे जीव तोडतेय..आणि माणुसकीहीन नेतृत्व फक्त राजकारणाच्या पलीकडे काहीच बघत नाही..किती भयंकर आहे ना सगळं …एक जीव वाचवण्यासाठी आरोग्य सेवा देणाऱ्या कीती मेहनत करावी लागतेय..पण लाखोंचा जीव धोक्यात घालणारे राजकारणी किती निर्लज्ज पणे वागताय ना?..कुठे गेलीय संवेदना सगळ्यांची..विरोधी पक्षांची सरकार म्हणून राज्याराज्यांना वेगळी वागणुक..किती भयंकर आहे सगळं ..या देशांचा नागरीक हा पहिला भारताचा आणि मग त्या राज्यांचा..असे असताना…या देशांचे सरकार म्हणून ..नेतृत्व म्हणून जबाबदारी कोणाची..
समाज म्हणून समाजाचीही काहीच जबाबदारी नाही का..?
हे असेच चालत राहीलं तर…?आपला विनाश अटळ आहे..
प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि स्वार्थ ही प्रवृत्ती आपल्या साठी आत्मघातकी ठरणारी आहे..
रोज हजारोने होणारे मृत्युचे आकडे पाहुनही…आम्ही देश म्हणून ..समाज म्हणून निगरगट्ट पणे फक्त पाहत बसु..तर..आपला विनाश अटळ आहे..
When Rome was burning…Nero was Fiddling….असेच कहीसे सुरु आहे देशात…उत्सव करायचा..लशीचा..ज्यांचा घरात मृत्यु झालाय त्यांना काय वाटत असतील असले शब्द ऐकुण…
आता बस..*महाराष्ट्र जगला पाहीजे*..त्यासाठी अत्यंत कठोर निर्णय शासनाने घेतले पाहीजेत..
माझी मुलगी पायाला लोखंड लागल्यावर TT चे injection घेत नव्हती..आधी प्रेमाने समजावून सांगितले जास्त दुखनार नाही बाळा..कशीबशी तयार झाली तर sister ला injection देवु देईना..शेवटी माझ्यातला बाप जागा झाला आणि एक कानाखाली ठेवुन दिली..का तर लेकीला tetanus सारखा आजार भविष्यात होवु नये म्हणून..तसंच जनतेच्या भल्यासाठी आता शासनाने बापासारखं कठोर होवुन फटके दिले पाहीजेत…जिवंत राहीलात तर व्यापार कराल…जिवंत राहीलात तर भाजीपाला किराणा घ्याल..जिवंत राहीलात तर पैसा कमावाल..जिवंत राहीलात तर आयुष्य जगाल…बेशिस्त आणि बिनधास्त राहुन कोरोना साथीत जगाल..नाहीतर विनाश अटळ आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *