कोरोनाची तीसरी लाट रोखण्यासाठी डॉ. नितिन राऊत चा मास्टर प्लान
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
तिसरी लाट रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करा! असा निर्देश डॉ. नितिन राउत ने दिले आहेत.
नागपूर शहर व ग्रामीण भागात कमीतकमी नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी व मृत्यू संख्या नियंत्रणात राहावी तसेच तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मास्टर प्लॅन तयार करावा असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनासोबत शनिवारी दि.८ मे रोजी आयोजित महत्वाच्या बैठकीत दिल्या. रुग्ण कमी झाले म्हणून गाफील राहू नका,असा इशाराही यावेळेस पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिला.
या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय
मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकर पूर्ण करणार
जिल्ह्यात २५ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन
जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारणार
कोरोना रुग्णांसाठी ५ हजार जंबो सिलेंडर उपलब्ध केले जाणार
दररोज दहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन
१ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार
प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर सक्षम करणार
आंबेडकर हॉस्पिटल, ईएसआयसी, हज हाऊसचे श्रेणी वर्धन
कोराडी, कामठी, रामटेक, मौदा,उमरेड, काटोल हॉस्पिटलचे श्रेणी वर्धन करणार
लहान मुलांना वाचविण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देश
स्थानिक डॉक्टरांना होम क्वारंटाइन रुग्णांची शुश्रूषा करण्याचे निर्देश
ट्रिटमेंट प्रोटोकॉल न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश
लसीकरण वाढविण्यासाठी आता अधिकार्यांची टीम गावांच्या भेटीवर
जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे पोलिसांना आदेश
पोलिसांनी पकडलेल्या रिकामटेकड्यांना 14 दिवस सोडू नका
रमजानच्या काळात घरातच सण साजरा करण्याचे आवाहन
रेमडेसिवीर व औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई
बोगस आरटीपीसीआर अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळावर कारवाई करण्याचे निर्देश
या अनुषंघाणी राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपुर चे पालकमंत्री डॉ. नितिन राउत यांची साथ सामान्य जनते सोबत दिसत येत आहे।
श्री राकेश ज्ञानहर्ष
नागपुर
विभागीय प्रमुख संवाददाता
8484874218