कृषी विभागा व्दारे तुर, धान, सोयाबीन बीज उगवण क्षमता प्रात्याक्षिक व मार्गदर्शन
*नागपूर* कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील गावात जावुन मंडळ कृषी अधिकारी व सहाय्यकांनी बीज उगवण क्षमता प्रास्ताविक ३% मिठ प्रक्रिया, पिकाची फेर पालट, बियाणे खरेदी विषयी ग्रामस्थ शेतक-यांना मार्गदर्शन केले.
मंगळवार (दि.४) मे २०२१ ला पारशिवनी कृषी विभागांतर्गत मंडळ कृषी अधिका-या व्दारे मौजा गुंढरी (पांडे), घुकशी, बखारी, गोंडेगाव व बोरडा या गावात तुर, धान, सोयाबीन बीज उगवण क्षमता प्रात्याक्षिक करून समाजावुन सांगत धानाची ३% मिठाची बिजाप्रक्रिया, पिकाची फेरपालट, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी आदी शेतीच्या महत्वाच्या विषयावर मा. मंडळ कृषी अधिकारी श्री. जी. बी. वाघ साहेब यांनी उपस्थित ग्रामस्थ शेतक-यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मा.कृ.प. कन्हान श्री. कुबडे सर, कृ. से. राठोड, ठोंबरे, गटकळ, ढंगारे, शेख, झोड सह ग्रामस्थ शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535