किशोर धोटे यांची राज्य सरकार ला मागणीकन्हान नदीला महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान……राज्य सरकारला 50% अनुदानाची मागणी
नागपूर : सावनेर तहसील अंतर्गत नंदापूर येथे 29 ऑगष्ट रोजी, कन्हान नदीच्या महापुरा मुळे नदीच्या पाण्याची थोप नांदोही गावापर्यंत पोहचली. शेतकरी किशोर धोटे यांच्या शेतीतील पीक पूर्णपणे उध्वस्त झाले. कारण गावापासून ५०० मीटर अंतरावरील कन्हान नदीवर कोच्छी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणे नदीच्या आजूबाजूला माती पडून होती, ती संपूर्ण माती वाहून गेली आणि जवळच्या शेतातील सर्व मातीचा थर जवळ-जवळ दीड फूट माझ्या निकटच्या शेतात येऊन गाळ पडला. पुरा मुळे अंदाजे 82 ते 84 तास सतत पाणी चालू होते व भरून होते. त्यामुळे माझ्या शेतातील कापूस पराठी व तुरीचे संपूर्णपणे नुकसान झाले व त्यामुळे पराटीचे झाडे गळून , वाहून ,वाळून गेलेत. म्हणजेच पूर्णपणे मराठीचे झाडे सडून गेली. त्यामुळे शेतातील कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळू शकले नाही. मी दिवस रात अहोरात्र मरमर काम करू न शेती केली परंतु महापुरामुळे माझे स्वप्न उध्वस्त झाले. माझे अंदाजे दीडशे क्विंटल कापूस ८ लाख 17 हजार 500 रुपये व तुरीचे नुकसान 20 क्विंटल अंदाजे १ लाख १६ हजार रुपये असे एकूण ९ लाख ३० हजार पाचशे रुपये, नुकसान झाले. साहेब मी एक गरीब शेतकरी असून माझ्या कुटुंबावरील उपासमारीची वेळ आली आहे. जीवन जगण्याचे साधन आहे फक्त शेती. माझ्या 10 एकर शेतीमध्ये कापूस आणि तुरीचे बी, बियाणे अशी लागण होती परंतु निसर्गाने माझ्या कुटुंबावर आघात केला. मी यावर्षी शेतीमध्ये उसनवारी करून अडीच लाख रुपयाची लागवड केली पण या भयानक महापुरा मुळे माझे ९ ते१० लाख रुपयांचे नुकसान झाले. माझ्या कुटुंबातील फक्त मी एकटाच शेतीतील काम करत होतो व माझे १३ व्यक्तींची कुटुंब माझ्यावरील अवलंबून होते. त्यामध्ये आई-वडील व बहिण आणि सर्व कुटुंबातील संख्या १३ व्यक्तींची संख्या होती. माझ्याकडे शेती व्यतिरिक्त कोणतेही साधन नाही. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची झाली. मी काहीही करू शकत नाही. कारण माझे शेतीचे नुकसान भयंकर झाले आहे व माझ्या वडलोपार्जित कर्जाचे बोजे माझ्यावर होते. ते मी कसे फेडणार हे माझ्या समोर सतत दिसत आहे. म्हणून मला आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, माझ्यावरील बाहेरचे उसनवारी कर्ज जवळ-जवळ अडीच लाख रुपये असून परत दि.ना.डी.से.को.ऑप बँक शाखा खापा, यांचे 2005 चे २ लाख ३२ हजार एकशे पंचेचाळीस थकित कर्ज देणे बाकी आहे. जवळ-जवळ एकूण ५ ते ६ लाख रुपये माझ्यावर कर्ज फेडणे आहे. ते मी कसे फेडणार हा प्रश्न माझ्या समोर पडला आहे. शासनाने सन २००८ व २००९ मध्ये कर्ज माफी केली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2017 मध्ये घोषित केली होती, तसेच महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 घोषित केली. अशा प्रकारे तीन वेळा कर्जमाफी होऊन सुद्धा मला कोणत्याही प्रकारचा कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. माझी आजच्या तारखेत बिकट, हलाखीची परिस्थिती आहे. मी शेतामध्ये दुसऱ्यांदा पेरणी व वाई करण्यास असमर्थ आहे. कारण या महापुरामुळे अतोनात नुकसान झाल्यामुळे मी परिस्थितीचा सामना शकत नाही. एवढ्या मोठ्या परिवारांचा उदरनिर्वाह कसा करता येईल हा प्रश्न माझ्या समोर निर्माण झालेला आहे. परंतु मला काहीच कळत नाही म्हणून मी सरकारला नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती पत्रकाद्वारे करीत आहे. जर मला न्याय नाही मिळाला, तर मला आत्महत्या करण्या शिवाय दुसरा पर्याय नाही. असा इशारा शेतकरी किशोर धोटे यांनी सरकारला केलेला आहे व शासनास विनंती आहे की मला नुकसान भरपाई ५० टक्के अनुदान देण्यात यावा. ही सरकारला विनंती व मागणी करत आहे. माझ्या शेतीतील नुकसान भरपाई जे झाली ते मला देण्यात यावी अशी माझी कळकळची विनंती व मागणी आहे. ह्या सर्व परिस्थितीचा विचार करून सरकारने योग्य ती चौकशी करून मला जास्तीत जास्त अनुदान मिळवून द्यावे हीच सरकारला माझ्या सहपरिवाराची व माझी नम्र विनंती आहे. राज्य शासनाने शेतीचे नुकसान झाल्याचा सर्वे केलेला आहे. पटवारी व कृषीअधिकारी यांच्या मार्फत सर्वे झालेला आहे. पण शेतकरी किशोर धोटे यांनी मंत्रीमहोदय सुनील केदार यांना अनुदान मिळवून द्यावे. जे नुकसान झालं, पण मला पन्नास टक्के अनुदान मिळाले पाहिजे अशी मागणी केली आहे त्यावर कृषीअधिकारी व पटवारी यांनी चिंता करू नका असे आश्वासन दिले. जर शासनाने मला शेतीचा 50% नुकसान भरपाई मोबदला नाही दिला तर, मी माझ्यासह व कुटुंबा सहित आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही याला जबाबदार फक्त राज्य सरकारच राहील. असे नंदापूर येथील शेतकरी किशोर धोटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी