किशोर गमे यांचा शिक्षक सत्कार बोखारा येथे संपन्न
Summary
संजय निंबाळकर/उपसंपादक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीतून एक प्राथमिक शिक्षक व एक माध्यमिक शिक्षक अशी शिक्षकांची निवड केली जाते त्यानुसार यावर्षी पंचायत समिती नागपूर अंतर्गत उच्च प्राथमिक शाळा बोखारा येथील श्री किशोर गमे यांची […]
संजय निंबाळकर/उपसंपादक
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीतून एक प्राथमिक शिक्षक व एक माध्यमिक शिक्षक अशी शिक्षकांची निवड केली जाते त्यानुसार यावर्षी पंचायत समिती नागपूर अंतर्गत उच्च प्राथमिक शाळा बोखारा येथील श्री किशोर गमे यांची जिल्हा आदर्श शिक्षक गौरव सन्माना करीता निवड झाली
त्यानुसार त्यांचा शिक्षक सत्काराचा कार्यक्रम शासकीय निर्देशाचे पालन करून बोखारा येथे त्यांचे शाळेत संपन्न झाला. सौ भारतीताई पाटील सभापती शिक्षण व अर्थ समिती जिल्हा परिषद नागपूर यांचे हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले , सदर कार्यक्रम सौ रेखाताई वर्ठी सभापती पंचायत समिती नागपूर यांचे अध्यक्षतेखाली, सौ ज्योती ताई राऊत सदस्य जिल्हा परिषद नागपूर सौ अर्चनाताई काकडे सदस्य पंचायत समिती नागपूर बोखारा येथील सरपंच सौअनिताताई पंडित,सौ. आवळे ताई ग्रामपंचायत सदस्य तसेच माननीय खंडविकास अधिकारी श्री कोवे साहेब माननीय गटशिक्षणाधिकारी श्री मडावी साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी गावातील जेष्ठ नागरिक केंद्रातील शाळेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक, विविध संघटनेचे पदाधिकारी प्रमुख्याने या कार्यक्रमास उपस्थित होते.सौ भारती ताई पाटील यांनी आपल्या भाषणातून श्री गमे सर हे अतिशय आदर्श शिक्षक आहेत व त्यांची संपूर्ण फाईल व इतर कार्य याबाबतची माहिती घेऊनच त्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले त्यांची प्रेरणा घेऊन इतर शिक्षकांनी सुद्धा कार्य करावे. आपली शाळा, गाव, केंद्र, तालुका यांचे नाव जिल्ह्यात कसे लवकिक करता येईल असे उत्कृष्ट कार्य करावे असे आव्हान उपस्थित शिक्षकांना केले. कोरोना काळात शाळा बंद असल्यातरी विध्यार्थ्यांन पर्यंत अभ्यास कसा पुरवता येईल या विषयीचे प्रयत्न करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना श्री गमे सर म्हणाले की माझ्या हातून जे काही कार्य झालं हे माझं कर्तव्य असून असे कार्य यापुढेही करण्यास तयार राहील व शिक्षक हा नेहमी एक विद्यार्थी असतो आणि त्यांनी नेहमी शिकत असले पाहिजे नवीन नवीन उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपला सहभाग नोंदवता येईल यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे श्री गमे सरांनी हा सत्कार त्यांच्या आईला समर्पित केला. त्याचप्रमाणे त्यांच्या यशस्वी जीवनाच्या पाठीमागे सदैव प्रेरणा म्हणून त्यांच्या सौभाग्यवती सौ उज्वला गमे ह्या असतात हे सुद्धा ते सांगायला विसरले नाही माझा खरा सत्कार हे माझे विद्यार्थी करत आहे असे सुद्धा त्यांनी सांगीतले ज्या शाळेत त्यांनी नोकरी केली त्या शाळेत त्यांच्या कार्याचा वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. अतिशय नम्र स्वभाव व्यक्तिमत्व व कार्यरत असणारे सदैव दुसऱ्याच्या कार्यात मदत करणारे श्री गमे सर यांना त्यांच्या सत्कार बद्दल खूप खूप अभिनंदन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री रामराव मडावी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नागपूर यांनी केले तर संचलन सौ रंजना सोरमारे यांनी केले तर आभार श्री तुकाराम ठोंबरे मुख्याध्यापक यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. मंदा कुंडाले व श्रीमती दिपमाला टेकाडे यांनी सहकार्य केले.
डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर तर्फे किशोर गमे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले
संजय निंबाळकर
उपसंपादक
9579998535
पोलीस योद्धा न्युज नेटवर्क