काटोल येथे काटोल व नरखेड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने झाला नारे निदर्शनाचा कार्यक्रम.
घटनाक्रम- फोटो व चित्रिकरणाव्दारे दर्शवण्यात येत आहे.
काटोल मध्ये पिरिपा चे आंदोलन
यु पी हातरस मध्ये दलित मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येचा जाहीर निषेध.
उत्तरप्रदेशातील हातरस येथील बिलोली या गावात दलित समाजाच्या मुलगी ही आपल्या आई सोबत शेतामध्ये काम करीत असताना आई पासून थोड्या दूर अंतर झाल्यावर थोडा दुरी झाल्याचा फायदा घेऊन 4 सवर्ण हिंदू नराधमांनी मुलीला जबरदस्ती उचलून नेऊन सामूहिक बलात्कार करून तिला जबर मारहाण केली यामध्ये पीडितांच्या मानेची व पाठीची हद्दी तुटली सोबत तिची जीभ कापण्यात आली एवढ्याअमानुष यातना पिढीतेला देण्यात आल्या तिला हात रस जिल्हा रुग्णालयात ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावरती बलात्कार झाल्याचे मान्य केले.पिढीतने आपल्या मृत्यू पूर्व जबाणीत 4 लोकांनी बलात्कार केल्याचे सांगितले तरीही पोलीस खात्याने बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली त्यापुढे ही ए डी जे लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी तर हद च पार केली पीडिते वर बलात्कार नसल्याचे सांगितले यावरून असे लक्षात येते की प्रशासन आणि पोलीस आरोपीना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे जिल्हा रुग्णालयातून रेफर केल्यानंतर दिल्ली येथील एम्स मध्ये भरती करणे आवश्यक होते तरीही प्रशासनाने सफदरजंग इस्पितळात भरती करून थातूर मातूर इलाज करून डॉक्टर आणि प्रशासनाच्या मिली भगत ने प्रट्रेक गोस्ट आरोपींना कसे वाचविता येईल म्हणून परिवाराला पीडिते ला भेटण्यास मज्जाव करण्यात आला पीडिते च्या मृत्यू नंतरही तिच्यावर अन्याय करण्यात आला परिवारासोबत बद्दसलुकी करून त्यांना धाक दाखवून पोलिसांकडून बंदिस्त करून शव विच्छेदनाच्या वेळी कुणालाही विश्वासात न घेता कुणाच्याही साह्य न घेता शव विच्छेदन करण्यात आले परिवाराला शव परिवाराचे सुपूर्द शव न करता परिवाराला बंदिस्त करण्यात आले पीडिता ची आई हिने चेहरा व हळदी लावण्याची मागणी केली तीही प्रशासनाने फेटाळून लावली परिवाराला धमकावून परिवाराच्या अनुपसतंगीतित रॉकेल टाकून पीडिते ला पेटवून देण्यात आलं हा सरळ सरळ पीडितेच्या बलात्काराचे सबुत मिटवण्याचा सरकारच्याच कुटील डाव होता,यामध्ये अजय बिस्ट उर्फ योगी याचाच हॅट असल्याचे पिरिपा चे जिल्हा अध्यक्ष श्री नरेंद्र डोंगरे हांणी म्हटले आहे या दर्दनाक घटनेचा विरोध करण्यासाठी दिनांक 9 ऑक्टोबर 2020 ल दुपारी 1 नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध व निदर्शने करण्यात आले या कार्यक्रमाचे नेतृत्व नरेंद्र डोंगरे,अध्यक्ष पिरिपा यांनी केले यामध्ये प्रमुख मागण्या करण्यात आल्या
1.हत्याकांडातील चारही आरोपींना फाशी देण्यात यावी.
2.या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाच्या निगरणीत व्हावा.
3.सफदरजंग हॉस्पिटल च्या डॉक्टरांची ही चौकशी व्हावी
4.प्रशासनिक अधिकारी ए डी जे प्रशांत कुमार,एस पी विक्रांत वीर डी एम प्रवीण कुमार एस डी ओ प्रेम कुमार मीना या सर्व सवर्ण अधिकाऱ्यावर अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करून यांना बडतर्फ करून जेल मध्ये पाठवावे. 5.पीडित परिवाराला सुरक्षा देण्यात यावी.
6.जातीयवादी अजय बिस्ट उर्फ योगी सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावे या सर्व मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी काटोल व उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल यांचे मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती श्री.रामनाथजी कोविंद यांना निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी पीडिता स्व.मनीषा वाल्मिकी व दलित नेता स्व.रामविलास पासवान यांना 2 मिनिट मौन धारण करून मूक श्रद्धांजली देण्यात आली,या कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष यांनी केले या प्रसंगी जिल्ह्याचे नेते अरुणजी वाहने,संजय बडोदेकर,संजय खांडेकर,नरखेड तालुक्याचे अध्यक्ष रोहित नारनवरे, काटोल तालुक्याचे अध्यक्ष नरेंद्र लांडगे,बळवंत नारनवरे,रवींद्र सोमकुवर, राजू बांगर,अरुण तागडे, जाधव,सुधाकर पाटील,रवी बागडे,संजय गायकवाड,मिलिंद गजभिये,विजय गायकवाड,दादाराव श्रीरसाठ, रवींद्र मेश्राम आणि शेकडो कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
आभार-संजय खांडेकर यांनी मानले.
गिरीश डोये
नागपुर
8080152868