कन्हान शहर महिला व युवक काँग्रेस तर्फे राहुल गांधीचा वाढ़दिवस संकल्प दिवस म्हणुन साजरा किसान विरोधी बिल, महागाई वाढविण्या-या सरकारच्या विरोध करित घोषणा देण्यात आल्या.

कन्हान : – मा. राहुल गांधी यांचा वाढदिवस ‘संकल्प दिवस’ म्हणुन कन्हान शहर महिला व युवक कॉग्रेस तर्फे तारसा रोड कन्हान येथे गॅस दरवाढ, किसान विरोधी बिल, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात घोषणा देत ‘संकल्प दिवस’ साजरा करण्यात आला.
शनिवार (दि.१९) जुन २०२१ ला खासदार मा. राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणुन तारसा रोड कन्हान येथे कन्हान शहर महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा सौ. रिता नरेशजी बर्वे व युवक काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजा यादव यांच्या संयुक्त विद्य माने मा. नरेश बर्वे उपाध्यक्ष नागपुर जिल्हा काँग्रेस कमेटी यांच्या नेतृत्वात मोदी सरकार च्या गॅस दरवाढ, किसान विरोधी बिल, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल दर वाढ विरोधात घोषणाबाजी करून ‘संकल्प दिवस’ सा जरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान शहर महिला काँग्रेस कमेटी नगरसेविका सौ गुंफा तिडके, श्रीमती पुष्पा कावडकर, कु. रेखा टोहने, कुंदा बर्वे, नगरसेवक योगेश रंगारी, मनिष भिवगडे, विनय यादव, युवक काँग्रेसचे आकिब सिद्दीकी, रोहित बर्वे, प्रशांत मसार, चंदन मेश्राम, गौतम नितनवरे, शरद वाटकर, सतीश पाली, सोनु मसराम, प्रदिप बावणे, सुनील आंबागडे, अश्विन बर्वे, जॉय फर्नांडिस, हसन शेख, अक्षय यादव, अजय कापसीकर, चेतन पगारे, आशिष बांते सहीत मोठया संख्येने काँगेस कार्यकर्ते उपस्थित होते.