कन्हान परिसरात पाऊसाची चांगली हजेरी, नदी ही दुथडी भरून वाहु लागली पेच धरणाचे दोन गेट उघडले, नदी काठाच्या नागरिकांना सर्तकतेचा निर्देश दिले होते.

कन्हान : – शहर व परिसरात गुरुवारी जोरदार पाव साचे आगमन झाल्याने नागरिकांना गर्मी पासुन थोडी मुक्ती मिळुन वातावरण आंनदी आणि प्रफुलित झाले. या अगोदर काही दिवसा पासुन थांबु थांबुन अंतराने थोडा फार पाऊस येत होता. कन्हान परिसरात गुरवार ला सका़ळ पासुनच आकाश ढगाळ असुन रिमझिम पाऊस सुरू झाला. दुपारी काळेभोर आकाश ढगाने व्यापल्याने एक दिड जोरदार पाऊस पडुन शहरात जागो जागी पानी साचले होते. गुरवारी सुरू झालेला पाऊस शुक्रवार व शनिवार ला सुध्दा येत होता. शहरा त तीन दिवस सतत झालेल्या पावसाने वातावरण थंड हो़ऊन लोकांना गर्मी पासुन थोडी मुक्तता मिळुन परि सर आंनदी व प्रफुल्लीत झाला. परंतु शहरतील मुख्य मार्ग व रस्त्यावर पाऊसाचे पाणी साचुन नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागला. यास्तव नगर प्रशा सनाने आतातरी शहरातील मुख्य नाले, नालीची साफ सफाई व्यवस्थीत करून घ्यावी अन्यथा येणा-या जोर दार पाऊसाचे पाणी व्यवस्थीत निकासी न झाल्यास लोकांच्या घरात शिरून नागरिकांना भयंकर त्रास सहन करून नुकसानीला सामोर जावे लागेल.
पेच धरणाचे दोन गेट उघडले, कन्हान नदी दुथडी भरून जलस्तर वाढला.
मध्यप्रदेशात पाऊसाचे चांगले आगमन झाल्याने चौराई धरण भरल्याने धरणाचे गेट उघडुन त्यातील पाण्याचा विसर्ग करित असल्याने पाणी तोहलातोड व पेच धरणात येत पेच धरणात ९१% च्या वर पाणीसा ठा होत असल्याने शुक्रवार (दि.११) ला सकाळी १० वाजता पासुन पेंच धरणाचे २ दरवाजे (गेट) ३० सेमी ने उघडुन धरणातील ०.२२८ (क्युमेक) पाण्याचा विस र्ग संबधित अधिका-यांच्या उपस़्थित पेंच नदी व्दारे कन्हान नदीत सोडण्यात आल्याने कन्हान नदी दुथडी भरून वाहुन नदीचा जलस्तर वाढला होता. यास्तव उपविभागीय अभियंता, पेंच पाटबंधारे उपविभाग पार शिवनी हयांनी उपविभागीय अधिकारी रामटेक व्दारे तहसिलदार पारशिवनी च्या मार्फत तालुक्यातील पेंच व कन्हान नदी काठावरील नागरिकांनी नदी पात्रात जावु नये व सतर्क राहावे तसेत जंगम मालमत्ता गुरे, ढोरे व ईतर नुकसान हो़ईल नाही यांची दक्षता व काळ जी घेण्याचा इसारा स्थानिक प्रशासना व्दारे दवंडी आणि इतर सुविधाने देण्यात आला होता.