ओबीसीे हे एका हाकेवर एकत्रित होणे हे ह्या शतकात तरी शक्य नाही. :- सुरेंद्रकुमार यांनी व्यक्त केले विचार
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ४ मे २०२१
ओबीसी हे एका हाकेवर एकत्रित होणे या शतकात तरी शक्य नाही
कारण ओबीसी मध्ये ओबीसीचा राष्ट्रीय व स्थानीय नेता नाही.असे मत सुरेंद्रकुमार यांनी व्यक्त केले आहे. तसेच दुसरे म्हणजे याच ओबीसी च्या बळावर त्यांना भाऊक व धार्मिक बनवुन मनुवादी 1947 पासुन देशात खेडोपाडी अंधश्रद्धा पसरवून आपले राज करित आहेत. त्याची प्रचीती नुकत्याच देशातील पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपाने हिंदू कार्ड वापरून सत्ता हस्तगत केली व काही ठिकाणी 3 चे 76 झाले. व त्यात ही रामाचा नाव वापरून ओबीसी ना उत्तेजित केले. आपल्या ओबीसी ना अजुनही माहिती नाही की राम ब्राह्मण नसुन क्षत्रिय होते.
आपला ओबीसी चा इमानदारीने एक घर दाखवा जिथे तुकाराम महाराज,शिवाजी महाराज, व फुले शाहू आंबेडकर, तुकडोजी महाराज,गाडगे महाराज,यांना जाणनारा व मानणारा,?
अरे ज्यांची सकाळ देव दर्शनाने व सायंकाळ देव आरती ने होते . तो समाज काय आपल्या हक्कासाठी लढणार.?? ते तर तुम्ही सध्याचे आभार माना की 52% वरून 27% व 27% वरून 18% टक्के व 18% वरून वैद्यकीय शिक्षणात 0% ही स्थिती आहे.
महाराष्ट्रात प्रदिप ढोबळे सर सारखे बोटावर मोजण्या इतके काही कार्यकर्ते काय करणार? व त्यात ही प्रदिप सर पासुन तर काही शासकीय नोकरी करणारे हे शासनासी बांधील राहूनच कार्य करतात. म्हणून आंदोलनात धार दिसून येत नाही. म्हणून विसरून जा? की ओबीसी ची जनगणना होइल? ज्या दिवशी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरानी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन करणार नाही तोपर्यंत कधीही तुमच्यातील देव व धर्मांधता संपणार नाही,,,नाही? असे मत ही सुरेंद्रकुमार यांनी व्यक्त केले आहे.