BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

ऑक्सिजन क्षेत्रातच संशोधन करणारे डॉ. भालचंद्र काकडे यांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू?

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021 ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशात करोना रुग्णांनाचा मृत्यू होत आहे. अशातच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचा चेन्नईत मृत्यू झाला आहे. डॉ. भालचंद्र काकडे कोण होते ? डॉ. काकडे मूळचे […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशात करोना रुग्णांनाचा मृत्यू होत आहे. अशातच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचा चेन्नईत मृत्यू झाला आहे. डॉ. भालचंद्र काकडे कोण होते ? डॉ. काकडे मूळचे कोल्हापुर चे असून त्यांनी शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी घेऊन फेलोशीप मिळवली.
पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा, जपानमधील टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंधननिर्मिती बाबत संशोधन केले.
त्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेने रेल्वे धावू शकेल, याचा ध्यास घेतला. वीस वर्षे त्यांनी या संशोधनात व्यतित केली. ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्याव्दारे रेल्वेही धावू शकेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले. इंधननिर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर सात पेटंटही मिळवले आहे. चेन्नई येथील एसआरएम रिसर्च इन्सिट्युटमध्ये डॉ. काकडे कार्यरत होते. दरम्यान, चेन्नई मध्येच दरम्यान कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यांना ऑॅक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सर्वानी धडपडत केली मात्र ऑक्सिजन अभावी त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *