एरटेल मोबाइल कंपनीचे टावर दाट लोकवस्तीतुन काढुन बंद करा स्थानिक नागरिकांचे नगरपरिषद कार्यालय अधिक्षकाला निवेदन.

एरटेल मोबाइल कंपनीचे टावर दाट लोकवस्तीतुन काढुन बंद करा
स्थानिक नागरिकांचे नगरपरिषद कार्यालय अधिक्षकाला निवेदन.
कन्हान : – नगरपरिषद अतंर्गत प्रभाग क्र. ७ येथील जुबेर शहिद खान उर्फ सोनु खान यांच्या इमारतीवर एरटेल मोबाइल कंपनीचे टावर लावण्यात आले असुन या टावर च्या निघणाऱ्या रेडियेशन मुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्या ने स्थानिक नागरिकांनी कन्हान-पिपरी नगरपरिषद चे कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरे यांच्याशी भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करित निवेदन देऊन तात्काळ दाट लोकवस्ती परिसरात लावलेला एरटेल मोबाइल कंपनीचा टावर काढण्याची मागणी केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ७ येथील रहिवासी जुबेर शहिद खान उर्फ सोनु खान यांच्या इमारतीवर एरटेल मोबाइल कंपनीचा टावर लावण्यात आला आहे . नगरपरिषद कार्यालया कडुन ना हरकत प्रमाणपत्र सुध्दा घेण्यात आले नाही. या मोबाइल टावर च्या निघ णाऱ्या रेडियेशन मुळे परिसरातील वृद्ध व्यक्ती, लहान मुले, उच्च रक्तदाब व मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला यांचे घातक परिणाम होतात. सध्या च्या परिस्थितीत कोव्हिड-१९ च्या प्रार्दुभावामुळे लोकांच्या आरोग्यास दुष परिणाम झाले असुन नागरिक भयंकर त्रस्त अस ल्याने केंद्र व राज्य सरकार आणि आरोग्य विभाग लोकांच्या प्रकृती कडे विशेष लक्ष देत असतांना ही ऐरटेल मोबाइल कंपनी व जुबेर शहिद खान उर्फ सोनु खान नगरपरिषद प्रशासन कडुन ना हरकत प्रमाण पत्र न घेता इमारतीवर एरटेल मोबाइल कंपनीचा टावर लावण्याचे कृत्य करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे. जर एरटेल मोबाइल कंपनीचा टावर च्या निघणाऱ्या रेडियेशन मुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला अतिघातक दुष परिणाम झाल्यास यास जवाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानि क नागरिकांनी कन्हान-पिपरी नगरपरिषद कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरे यांच्याशी भेटुन या गंभीर विष यावर चर्चा करित निवेदन देऊन तात्काळ परिसरात लावलेला एरटेल मोबाइल कंपनीचा टावर काढुन बंद करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी सतीश उन्हाले , सुधीर डांगे, शालीकराव बावने, सचिन यादव, प्रशिक फुलझले, अनिल उमरकर, रघुनाथ लोंखडे, अविनाश निबुरकर, भास्कर ठाकुर, अश्वीनी उमरकर, शांताबाई झाडे, सुषमा श्रीवास्तव, सुनिता उपासे, कौशलबाई मेश्राम, वर्षा बावने, राधा मेश्राम, किरण माहुलकर, मालती कुथे, गिता कुर्वे, दुर्गा कांमडे सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
9579998535