BREAKING NEWS:
आरोग्य नागपुर हेडलाइन

उष्माघाताची कारणे, खबरदारी व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. ⭕ हृदयरोग तज्ञ डॉ.अनिल रूडे यांचा सल्ला.

Summary

नागपूर दि.५ में २०२४:- शहरात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची नितांत गरज आहे. आरोग्य विभागाने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे व सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार नागरिकांनी पालन करणे आवश्यक […]

नागपूर दि.५ में २०२४:-
शहरात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची नितांत गरज आहे. आरोग्य विभागाने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे व सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे टाळावे,कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे कमी करावे.
जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे,
घट्ट कपड्याचा वापर करणे टाळावे,
अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध आल्याने
उष्माघात होतो.
थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे
रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था असे लक्षणे दिसताच
उपचार सुरू करणे आवश्यक आहे.
रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे,
रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत
रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी
रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक्ड लावावेत.
आवश्यकतेनुसार शीरेवाटे सलाईन देण्यासाठी डॉक्टरकडे
जावे. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे.
हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा
प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे समजावीत. चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे
कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे.
पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा
बाहेर कामकाज करताना मध्ये ..मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा
गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.
रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी १२.०० ते ३.३० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे
गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत .उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.
शरीराचे जास्त तापमानात नुकसान होत असते.यात सुरक्षित राहावे.
उष्मघातामुळे झालेल्या मृत्यूनंतर आता उष्णतेमुळे जाणवाऱ्या समस्यांकडे अनेकजण बारकाईने लक्ष देऊ लागले आहेत. यात स्वत:च्या काळजीसाठी प्रत्येकाने उन्हाळ्यात घराबाहेर पडताना स्वत:ची एक पाण्याची बॉटल कॅरी केली पाहिजे.
४० अंशापेक्षा जास्त तापमान वाढल्यास शरीरात बरेच फरक दिसतात. एप्रिल महिन्यापासूनचं तीव्र उष्णतेच्या झळा सहन कराव्यात लागत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ दिसून येत आहे. संपूर्ण उत्तर भारतात तापमान ४३ अंशांवर जाऊन पोहचले आहे. येत्या काही दिवसांत तापमानात ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यात महाराष्ट्रातही तापमानात सतत वाढ होते. सकाळी ८ वाजता सूर्याची किरणे तीव्र होऊ लागली आहेत. यामुळे काही दिवस राज्यात कडक ऊन सहन करावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे. हवामान बदलामुळे उष्णतेशी निगडीत आजारांप्रमाणेच अन्नसुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर बनतो आहे आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार वेगानं होतो आहे.
निरोगी आयुष्यासाठी स्वच्छ हवा, स्वच्छ आणि पुरेसं पेयजल, पुरेसं आणि सकस अन्न आणि सुरक्षित निवारा या गोष्टींची गरज असते. पण हवामान बदलामुळे काही गोष्टी मिळणं कठीण होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले होते.
तापमान, हवामान बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात, याची यादीच WHO ने प्रकाशित केलेली आहे.
अतीतीव्र नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या दुखापती आणि मृत्यू
दूषित पाण्यातून पसरणारे आजार
डायरिया , कुपोषण
अन्नावाटे पसरणारे आजार , प्राण्यांवाटे माणसांमध्ये पसरणारे रोगजंतू , डास किंवा कीटक चावल्याने होणारे आजार हृदयरोग , कॅन्सर मानसिक आरोग्याच्या समस्या हे प्रश्न हवामान बदलामुळे आणखी वाढत असल्याचा इशाराही WHO ने दिला आहे. त्यामुळे दरवर्षी 2,50,000 अतिरिक्त मृत्यू होतील असं भाकितही WHO ने वर्तवली आहे.
संयुक्त राष्ट्रांची मुलांसाठी काम करणारी संस्था युनिसेफनेही काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. उष्णतेच्या वाढत्या लाटांपासून मुलांचं आणि कमजोर गटांचं संरक्षण करण्यासाठी निधी उभा करण्याची तातडीनं गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *