उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली बाणेरच्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलची पाहणी
Summary
पुणे, दि.16 : बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज भेट देऊन तेथे नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेत वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, नगरसेवक […]
पुणे, दि.16 : बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज भेट देऊन तेथे नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेत वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, नगरसेवक बाबुराव चांदेरे, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.आशिष भारती, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह सबंधित अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हॉस्पीटलमध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सुविधांचा तसेच साधन सामुग्रीचा आढावा घेतला तसेच रुग्णालयातील एकूण क्षमता, आयसीयूमध्ये असलेल्या सोई सुविधा आदी तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
हॉस्पीटलची ठळक वैशिष्ट्ये
एकूण बेड क्षमता-209
ऑक्सीजन बेड-147
आयसीयू बेड-62
ऑक्सीजनसाठी दोन प्रकल्पाची उभारणी