*आम आदमी पार्टी चा विज कनेक्शन जोड़ो सत्त्याग्रह* *आम आदमी पार्टी चे विजबिल आंदोलन* *महावितरण ने केशवद्वार रेशिमबाग चौक मध्ये कापलेले विज कनेक्शन आम आदमी पार्टी ने जोडले* *जिल्हा अधिकारी यांना विज कनेक्शन कपात थांबवन्य बाबत निवेदन देण्यात आले* *नागपुरात वाहाडत्या विजबिला विरोधत आम आदमी पार्टीचा केजरीवाल प्याटर्न*
*नागपूर* आज दि 24/3/2021 रोजी सकाळी 10.30 वास्ता महावितरण ने केशवद्वार रेशिमबाग चौक येथील घरचे विज कनेक्शन आम आदमी पार्टी ने जोडले. हे विज कनेक्शन कायदेशीर नोटिस न देता कापन्यात आले होते. विज उपभोगता घरमालक हफ्ते बांधन्याची मागणी करीत पैशे भरण्यास तयार आहे, तरीही महावितरण ने विज कापलि. लॉकडाउन मुळे लोकांचे व्यवसाय अस्ताव्यस्त झाले आहेत. कोरोना काळात लोकांची आर्थिक परिस्तिति खुप विकट आहे. राज्य सरकार लोकांन कडून विजबिल बळजबरीने वसूल करत आहे. राज्य सरकारची कोरोना काळात असंवेदनशीलता दिसून येते. आता नागपुर मध्ये परत लॉकडाउन लागले आहे, अश्या परिस्थितित लोकपैसे भरण्यास असमर्थ आहेत.
लॉकडाउन नंतर आम आदमी पार्टीने विजबिलाचा प्रशन सतत उचलून धरला. यात वाहाडलेल्या विजबिलाच्या होळी जाळन्या पासून, महावितरण च्या ऑफिसला कुलुप ठोकेपरियांत व मुख्यमंत्री यांच्या विरोधात पुलिस तक्रार असी अनेक आंदोलने केले. आता कापलेले विज कनेक्शन आम आदमी पार्टी जोडनार व या विजबिल आंदोलनाला पुढे राबविणार असा निश्चय आप ने केला आहे.
आज केशवद्वार रेशिमबाग चौक चे विज कनेक्शन आप च्या कार्यकर्त्यांनी जोडले. हे कनेक्शन जोडन्यात गिरीश तीतरमारे व रविकांत वाघ, यांची प्रमुख भूमिका होती. या मोहिमीत नागपुर संयोजक कविता सिंघल, विधर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, राज्य युवा समिति सदस्य कृतल वेलेकर, नागपुर युवा संयोजक गिरीश तितरमारे, मध्य नागपुर संघटन मंत्री प्रभात अग्रवाल, उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे, विनोद गौर, प्रतीक बावनकर, हेमंत पांडे, अक्षय दुपारे, विशाल चौधरी, विशाल पटले आणि अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्तित होते. जिल्हा अदिकारी यांना निवेदन फेखिल देण्यात आले यावेळी नागपुर संयोजक कविता सिंघल, सचिव भूषण ढाकूलकर, उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे व नागपुर सह सचिव मुन्ना तिवारी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
957999853