हेडलाइन

*आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र व्दारे निषेध सभा संपन्न* #) आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा. के. सी. पाडवी यांचा जाहीर निषेध.

Summary

नागपूर कन्हान : – आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र व्दारे आदिवासी गोवारी समाजावर घटना बाहय निर्णय लादल्या बद्दल आ़बेडकर चौक कन्हान येथे निषेध सभा घेऊन आदीवासी विकास मंत्री के सी पाडवी यांचा जाहीर निषेध करण्यात आला. आंबेडकर चौक कन्हान येथे […]

नागपूर कन्हान : – आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र व्दारे आदिवासी गोवारी समाजावर घटना बाहय निर्णय लादल्या बद्दल आ़बेडकर चौक कन्हान येथे निषेध सभा घेऊन आदीवासी विकास मंत्री के सी पाडवी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
आंबेडकर चौक कन्हान येथे गुरूवार (दि.३१) ला डॉ बाबासाहेबआबेंडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून निषेध सभेला सुरूवात करण्यात आली. यावेळी दि. १८/१२/२०२० ला दिलेल्या सुप्रीम कोर्ट निर्णयात के.सी.पाडवी यांनी दिशाभुल केली व घटना बाह्य निर्णय गोवारी समाजावर लादण्यात आल्याने समाज बाधवावर अन्याय करून या सर्व घटना क्रमा वार के. सी पाडवी यांनी वैयक्तिक वैर असल्यागत गोवारी समाजावर अन्यायाची पुनरावृत्ती केली.असे प्रतिपादन श्री भगवानजी भोंडे आणि श्री आनंद सहारे यांनी व्यकत केले. आम्ही गोवारी पुन्हा १९९४ पेक्षा अधिक ताकतीने मोठ्या जोमाने सरकारला न्याय देण्यास भाग पाडु , आमचा संघर्ष अजून संपलेला नाही. असे वक्ते दिनकर सोनवाने आणि मुरलीधर सोनवाने यांनी सांगितले. तसेच पार्टी पक्षाच्या वादाला दुर ठेवुन सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निषेध सभेला पाठिंबा दिला. यात विनायकजी वाघधरे, राजेंद्र हटवार , कल्याण अडकणे, संगीता वांढरे आणि सामाजिक कार्यकर्ते रिन्केश चवरे, स्वप्निल वाघधरे, लिलाधर बर्वे, सचिन वासनिक, भगवान सरोदे, शिवशंकर चकोले, रंजनिश (बाळा) मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र पार शिवनी तालुका अध्यक्ष नेवालालजी सहारे, नगरसेवक अनिल ठाकरे, भोलाजी वगारे मुसेवाडी, मारोती गाते कन्हान, चैतराम मानकर खापरखेडा, श्रीमती येणुबाई वाघाडे कान्द्री, कुसुमताई सोनवाने कान्द्री, विशाल नेवारे, ईश्वरजी राऊत, राधेश्याम चचाने, सत्येन शेन्द्रे, रामाजी वाघाडे, प्रकाश सोनवाने, मनोज चौधरी, लोकेश राऊत , ललित कुमार सहारे, ज्ञानेश्वर नेवारे आदी सह गोवारी समाज संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधवानी प्रामुख्याने उपस्थित राहुन आदीवा सी विकास मंत्री के सी पाडवी यांचा जाहीर निषेध केला. निषेध सभेला उपस़्थितीताचे कन्हान शाखेचे युवा व तडफदार कार्यकर्ते विनोद कोहळे मु कान्द्री यांनी आभार व्यकत केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
तथा
नागपूर विभागीय अध्यक्ष
डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *