BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

आज प्रशासन व राजकीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

Summary

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या स्व.आ.भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेकरीता भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. याची दखल घेवून कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मतदान केंद्रे, सहाय्यक मतदान केंद्रे, मतदार नाव नोंदणीबी.एल.ए. नियुक्ती आदीबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या […]

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या स्व.आ.भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेकरीता भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

याची दखल घेवून कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मतदान केंद्रे, सहाय्यक मतदान केंद्रे, मतदार नाव नोंदणीबी.एल.ए. नियुक्ती आदीबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पदाधिकारी यांची बैठक सोमवार दि. १५ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सायंकाळी ५ वा . आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

२५२-मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आ.भारत तुकाराम भालके यांचे निधन झाल्यने रिक्त झालेल्या जागेकरीता भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०२१ च्या अनुषंगाने कोरोना विषाणू (कोविड १९) संसर्गाच्या पार्श्वभुमिवर ज्या मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या ही १००० पेक्षा जास्त आहे.

अशा मतदान केंद्राच्या ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्राची उभारणी करणे, मतदान केंद्राच्या नावात बदल, पुर्वीच्या मतदान केंद्रााची इमारत मोडकळीस आल्याने मूळ मतदान केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर सहाय्यकारी मतदान केंद्राच्या ठिकाणी झालेला बदल, नावात झालेला बदल, रेसीड्युयल व्होटर (छायाचित्र नसलेले मतदार), नवीन मतदार नोंदणी व बी.एल. ए. नियुक्ती याबाबत आज सोमवार दि.१५ रोजी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

तरी या बैठकीस पंढरपूर -मंगळवेढा तालूक्यातील राजकीय पदाधिकारी यांनी उपथित रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे

सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *