हेडलाइन

आंतरराष्ट्रीय ई-काॅन्फरन्सचे आयोजन

Summary

गोविंद गोरे/जिवती ग्रामीण प्रतिनिधी घुग्घूस: गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली आणि चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस येथील खेळ व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोज शुक्रवारला “योगा फॉर मेंटल हेल्थ” या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येत आहे. या […]

गोविंद गोरे/जिवती ग्रामीण प्रतिनिधी

घुग्घूस: गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली आणि चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस येथील खेळ व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोज शुक्रवारला “योगा फॉर मेंटल हेल्थ” या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येत आहे.
या कॉन्फरन्सच्या उद्घाटकीय कार्यक्रमाचे अध्यक्ष,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्रभारी- कुलगुरू माननीय डॉ.श्रीनिवास वरखेडी राहणार आहेत.तर या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.अनिलजी करवंदे,बोर्ड ऑफ मॅनेजमेंट एल एन आय पी इ डिम्ड युनिव्हर्सिटी ग्वाल्हेर हे करतील.
उद्घाटकीय सत्रानंतर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहूर्ले यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सत्राची सुरुवात होईल.यात भारतीय शिक्षण मंडळाचे संघटन सचिव, श्री मुकुलजी कानिटकर हे ‘योगा जीवन पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन करतील. प्रा. नतालिया साॅल्वीय संचालक,आत्मबोधा योगा इन्स्टिट्यूट,अर्जेंटीना या ‘मीनिंग ऑफ लाइफ बेस ऑन सायकॉलॉजिकल कंडीशन अॅन्ड रोल ऑफ योगा’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य,प्रशांत दोंतुलवार यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या सत्राची सुरुवात होईल.लोणावळा येथील योगा इन्स्टिट्यूट, पुणेचे संचालक डॉ. मन्मत घरोटे हे ‘इम्पॉर्टन्स ऑफ मेंटल हेल्थ अँन्ड एज्युकेशनल हेल्थ इन मॉडर्न ईरा’ विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
या कॉन्फरन्सच्या समारोपीय सत्राचे अध्यक्ष प्रा.मनिषजी पोतनुरवार सह-सचिव, चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ,बल्लारपूर हे राहतील.यामध्ये डॉ.मनीषजी उत्तरवार डायरेक्टर इनोवेशन इंक्युबेशन अॅन्ड लिंकेजेस गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली हे मार्गदर्शन करतील. श्री स्वप्नीलजी दोंतुलवार सचिव, चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ,बल्लारपूर हे प्रामुख्याने ऑनलाईन समारोपीय सत्रात उपस्थित राहतील.
या ई-काॅन्फरन्सच्या आयोजन समितीमध्ये प्राचार्य,चंद्रशेखर कुंभारे हे ई-काॅन्फरन्सचे संचालक आहेत.डाॅ.रवी धारपवार हे महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी कोआॅर्डिनेटर तसेच प्रा. संतोष गोहोकार हे या ई-काॅन्फरन्सचे समन्वयक म्हणून जबाबदारी पारपाडत आहेत.
या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ई-काॅन्फरेन्समध्ये बहुसंख्य लोकांनी सहभागी व्हावे असे आयोजन समितीने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *