अर्थसंकल्पावर डाक्टर आषिश देशमुख यांची प्रतिक्रिया
Summary
अर्थसंकल्पातून राज्यातील वंचित उपेक्षित आणि दिव्यांग जनतेला विकासाचा कृषी ग्राम विकास आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. खऱ्या अर्थाने सर्वजन हिताय असा हा अर्थसंकल्प आहे. कोरोणाचे भयावह संकटात असताना सुद्धा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकार द्वारे मांडण्यात […]
अर्थसंकल्पातून राज्यातील वंचित उपेक्षित आणि दिव्यांग जनतेला विकासाचा कृषी ग्राम विकास आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. खऱ्या अर्थाने सर्वजन हिताय असा हा अर्थसंकल्प आहे. कोरोणाचे भयावह संकटात असताना सुद्धा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकार द्वारे मांडण्यात आला. असे असताना विरोधी पक्षाला या अर्थसंकल्पात चांगली काहीच दिसू शकत नाही. महाविकासआघाडी एवढे चांगले काम करीत आहेत हे त्यांना बघवत नाही. कृषी क्षेत्रात शाश्वत आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अर्थसंकल्पातून बळकटी मिळणार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून यंदाच्या अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी योजना जाहीर करून रोजगारांना चालना मिळणार आहे. औद्योगिक, शैक्षणिक, कृषी सह विविध क्षेत्रांना चालना देणारा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे.
आकाश राजेंद्र गजबे
अध्यक्ष, नागपूर जिल्हा
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस