BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

अनधिकृतपणे मोबाईल फोन वापरल्यासंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल -निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी २७ – मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघ

Summary

मुंबई दि 16:- लोकसभा निवडणूक मतमोजणीदरम्यान 27-मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावरील घटना ही उमेदवाराच्या सहाय्यकाने अधिकृत व्यक्तीचा मोबाईल फोन अनधिकृतपणे वापरल्याची घटना असून यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यापूर्वीच फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती 27- मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या […]

मुंबई दि 16:- लोकसभा निवडणूक मतमोजणीदरम्यान 27-मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावरील घटना ही उमेदवाराच्या सहाय्यकाने अधिकृत व्यक्तीचा मोबाईल फोन अनधिकृतपणे वापरल्याची घटना असून यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यापूर्वीच फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती 27- मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली.

यासंदर्भात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.

‘ईव्हीएम‘ हे ‘स्टॅण्ड अलोन‘ यंत्र

27- मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी म्हणाल्या, ‘ईव्हीएम’ अनलॉक करण्यासाठी मोबाईल फोनवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येत नाही. कारण त्यात ‘वायरलेस कम्युनिकेशन’ क्षमता नाही. याबाबत चुकीची माहिती काही माध्यमातून पुढे आली आहे. ‘ईव्हीएम’ ही ‘ईव्हीएम’ सिस्टीमच्या बाहेरील कोणत्याही ‘वायर्ड’ किंवा ‘वायरलेस कनेक्टिव्हिटी’ शिवायची स्वतंत्र उपकरणे आहेत.

यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ शकत नाही.

यासंदर्भातील मतमोजणीचा सर्व घटनाक्रम उमेदवारांच्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नोंदविण्यात आला आहे.

प्रत्येक मोजणी पत्रकावर मतमोजणी प्रतिनिधीची स्वाक्षरी

ETPBS ची मतमोजणी मतपत्रिका स्वरूपात होते. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नाही

ETPBS आणि EVM मोजणी आणि पोस्टल मतपत्रिका मोजणीसाठी (ETPBS सह) प्रत्येक टेबलावरील प्रत्येक मोजणी पत्रकावर मतमोजणी प्रतिनिधीची स्वाक्षरी घेण्यात आली आहे.

‘ईव्हीएम’ बद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल आणि भारतीय निवडणूक पद्धतीबद्दल शंका निर्माण केल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधित वृत्तपत्रांना नोटीस बजावली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *