BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

अंत्यसंस्कारसाठी डिजल उशिरा आल्याने मनपाच्या कर्मचाराला मारहाण

Summary

चन्द्रपुर:- कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठानपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमित केले जातात. महानगर पालिका चे कर्मचारी हे सेवाकार्य नियमीत करत असतांना 24 एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहोचल्याने अंत्यविधिला उशीर झाला. यावेळी मृताच्या […]

चन्द्रपुर:- कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठानपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमित केले जातात. महानगर पालिका चे कर्मचारी हे सेवाकार्य नियमीत करत असतांना 24 एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहोचल्याने अंत्यविधिला उशीर झाला. यावेळी मृताच्या नातलगांनी मजूर कर्मचारी मिलिंद शंकरराव पुट्ठेवार (वय 26 वर्ष ) यास शिविगाळ करुण हातबुक्कयांनी मारहाण केली व पळून गेले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुण कलम 323, 504, 506 भांदवी प्रमाणे एनसी नोंद करण्यात आली.
महानगरपालिका तर्फे सध्या कोविडच्या कामात स्मशानभूमि येथे मृतदेह जाळन्याच्या कामावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. फिर्यादि मिलिंद शंकरराव पुट्ठेवार ( वय 26 वर्ष ) व त्याचे सहकारी इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशांभूमित नेहमी प्रमाणे कोरोना संक्रमित असलेल्या मृतदेहांनच्या अंत्यविधिसाठी उपस्थित होते. त्या दरम्यान दवाखान्यातुन शववाहीकेद्वारे कोरोना संक्रमित मृतदेह आनन्यात आले. मजूर कर्मच्यारांनी नदीच्या काठावर अंत्यविधि करता लाकुड रचुन ठेवले होते. मृताच्या नातलगाकडून धार्मिक पद्धतीने पूजा अर्चना झाल्यानंतर मृतदेह जाळन्याकरिता लगाणाऱ्या डिजेल ची वाट पाहत होते. तेव्हा बालापुर तलोधी येथील मृताचे इतर नातेवाईकापैकी अंदाजे अनोळखी तीन ते चार व्यक्ति हे मिलिंद शंकरराव पुट्ठेवार (वय 26 वर्ष ) यांच्या जवळ आले. “दहन करायला एवढा उशीर का लागत आहे ” अशी विचारना केली. तेव्हा त्यांनी डिझेल यायचे आहे. मी सुद्धा डिझेलची वाट पाहत आहो असे म्हटले. तेव्हा अज्ञात व्यक्तिंनी मिलिंद यांनचे मनने ऐकून न घेता शिविगाळ करुण हतबुक्कयांनी मारहाण केली व पळून गेले. त्या नंतर डिझेल आल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुण कलम 323, 504, 506 भादंविप्रमाने एनसी नोंद करण्यात आली.

अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *