वर्धा

▪ जगातील सर्वात मोठा चोर बाजार ! !▪ ▪ राजकारण आणि चोरबाजार यात अलीकडे फारसा फरक राहिला नाही. पण भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा चोर बाजार आहे .याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.▪ ▪ नरेंद्र मोदी हे अकरावे अवतार आहेत असे त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने जाहीर करून टाकले होते. फडणवीस अकराव्या अवताराचे अंडे .▪ ▪ज्ञानेश वाकुडकर ▪ अध्यक्ष, लोक जागर अभियान

Summary

सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी झाडे लावली !ती दिसली का कुणाला? गडकरी पाण्यावर विमान उतरणार होते , दिसले का कुणाला ? मिहान सुरू झाल्यास किमान दहा हजार ड्रायव्हरच्या नोकऱ्या उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले होते ! दहा हजार ड्रायव्हरच्या नोकऱ्या […]

सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी झाडे लावली !ती दिसली का कुणाला? गडकरी पाण्यावर विमान उतरणार होते , दिसले का कुणाला ? मिहान सुरू झाल्यास किमान दहा हजार ड्रायव्हरच्या नोकऱ्या उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले होते ! दहा हजार ड्रायव्हरच्या नोकऱ्या आणि त्यांचे सरासरी पाच लोकांचे कुटुंब म्हणजे पन्नास हजाराचे ‘ एक ड्रायव्हर स्वप्नपूर्ती शहर ‘ रोज माझ्या स्वप्नात येते तिथली बाया-माणसं पोरं-पोरी सारेच मला ड्रायव्हरच्या ड्रेस मध्ये फिरताना दिसतात . इच्छा असेल तर तुम्हाला देखील ते शहर ते पहाता येईल.
मुद्दा असा आहे की आता ‘ मला सत्ता दिली तर चार महिन्यात ओबीसींना आरक्षण देतो ‘. अशी फुशारकी फडणवीस यांनी नुकतीच मारली कोणाच्या आधारावर असे करणार आहेत ? मराठा आरक्षण तिकडे वादात सापडले आहे. त्यासाठी सरळ मोदींना भेटून विषय निकालात का ? काढत नाही ? जनतेला किती वेळा मूर्ख बनवणार ? वेगळ्या विदर्भासाठी शपथ घेणारे फडणवीस राज्यात आता केंद्रातही त्यांची सत्ता असताना गेली सात वर्ष कुठे झोप काढत आहेत ? त्यांचा काय प्रॉब्लेम होता ? झटपट वेगळा विदर्भ का करून टाकला नाही ? कोरोना च्या प्रकरणात हे महाशय अशीच आगलावी भूमिका घेत होते . स्वतः उपद्रव करत होते बाहेर जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत होते ! अजूनही त्यांचे धंदे थांबलेले दिसत नाहीत .
भाजपकडे असे एकापेक्षा एक नग आहेत खोटे बोलणे ,अफवा पसरवणे, द्वेषाचे विष पेरणे, दुसऱ्याचा माल आपल्या नावावर खपवने अशा कामात भाजपचे लोक निष्णात आहेत . यांच्याकडे स्वतःचे असे ओरिजनल काही नाही याची त्यांना कधीही लाज वाटली नाही . उचलेगिरी हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम गांधी असो, आंबेडकर असो ,सरदार पटेल असो ….. नेते देखील दुसऱ्याचेच ! सदैव उचलेगिरी आणि वरून जागतिक दर्जाचा थापा ! हाच त्यांचा धंदा .
अर्थात बाकीचे पक्ष फार इमानदार आहेत असे नाही ! पण भाजप वाल्याच्या तुलनेत अगदी फुटकळ आहेत . वडापावची गाडी समजा , भाजपचा बाजार मात्र जागतिक दर्जाचा……सर्वात मोठा !
देश आणि आपणही जेवढ्या लवकर या घोर बाजाराच्या विळख्यातून बाहेर पडू , तेवढे बरे !
तूर्तास एवढेच…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *