वर्धा आर्वी टी पॉइंट ला वसंतराव नाईक नाव द्या गोर सेनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड यांनी आमदाराला दिले निवेदन मागणीसाठी निघणार बाईक रॅली गोर बंजारा समाजाला आवाहन

पोलीस योद्धा वृत्तसेवा
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांचे नाव शहरातील वर्धा तळेगाव टी पॉइंटला द्या अशी मागणी गोर सेनेची असून त्यांनी आमदार दादारावजी केचे यांना निवेदन दिले आहे .स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांनी सलग अकरा वर्ष महाराष्ट्र राज्याची धुरा सांभाळून एक इतिहास निर्माण केला आहे. त्यांच्या कारकिर्दीत शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले हरित क्रांतीचे ते जनक असून शेतीला समृद्ध करण्याचा त्यांनी चंग बांधला होता. महाराष्ट्रात धरणाची निर्मिती करून वाहून जाणारे पाणी अडवून कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्याचे मोठे काम त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाले त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र कृषी क्षेत्रात समृद्ध झाला अशा महान नेत्याची नाव टी पॉइंट ला देऊन त्यांच्या कार्याची पावती द्यावी अशी मागणी गोर सेनेच्या निवेदना मधून करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड उपाध्यक्ष जगदीश पवार ,अंकुश जाधव ,कैलास जाधव आदींचा समावेश असून यावेळी राजाभाऊ वानखेडे ,मिलिंद हिवाळे ,कुणाल कोल्हे ,भगत ,रोशन पवार आणि महेश देव शोध उपस्थित होते