KFW विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्ज करारावर स्वाक्षरी
Summary
मुंबई मेट्रो मार्गिका ४ व ४-अ या प्रकल्पासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्ज करारावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. मुंबईकरांसोबत ठाणेकरांचाही दैनंदिन प्रवास आरामदायी […]

मुंबई मेट्रो मार्गिका ४ व ४-अ या प्रकल्पासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्ज करारावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
मुंबईकरांसोबत ठाणेकरांचाही दैनंदिन प्रवास आरामदायी व गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेट्रो मार्गिका ४ व ४-अ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल,अशी ग्वाही देताना मुंबई महानगर परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हा प्रकल्प बदल घडवेल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.
आजचा दिवस महत्वाचा आहे. मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुसह्य होण्यासाठी मेट्रोच्या प्रकल्पांना गती दिली जात आहे. मेट्रो मार्गिका ४ आणि ४-अ साठी केएफडब्ल्यू संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रकमेचे कर्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दक्षिण मुंबई न्यूज प्रतिनिधी