महाराष्ट्र

🚩🚩संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव 🚩🚩

Summary

✍️महाराष्ट्राचे थाेर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्रीसंताजी जगनाडे महाराज यांच्या 396व्या जयंती निमीत्त दि.8-12-2020 महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा (युवक आघाडी)तुमसर तालुक्याच्या वतीने माेठया उत्साहात मुक्ताबाई कन्या प्राथ.शाळा तुमसर येथे आयाेजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख […]

✍️महाराष्ट्राचे थाेर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्रीसंताजी जगनाडे महाराज यांच्या 396व्या जयंती निमीत्त दि.8-12-2020 महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा (युवक आघाडी)तुमसर तालुक्याच्या वतीने माेठया उत्साहात मुक्ताबाई कन्या प्राथ.शाळा तुमसर येथे आयाेजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. वासुदेवजी वाडिभस्मे, मा.शरदजी खाेब्रागडे, मा. रवीजी वाघमारे सर, जगदीशजी गभणे तसेच तिलक बालपांडे (प्रदेश महासचिव)महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज युवक आघाडी यांची प्रामुख्याने उपस्थीती हाेती. संकेतदादा सुरेशचंद्रजी लांजेवार
(तुमसर तालुका अध्यक्ष) महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा(युवक आघाडी)
यांनी मनाेगत व्यक्त केले त्यांनी सांगितले संताजी जगनाडे महाराजानी केलेल्या कार्यामुळे आज जगदुरु तुकाेबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पाेहचलेत इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा जनसागरातुन बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी केला. त्यांनी हे अभंग पुन्हा मिळवुन लिहुन काढलेत.
त्यांच्या सहजलेखनात किती माेठ्ठं जगण्याचं तत्वद्यान हाेतं.संतु म्हणे मी हे तेल काढियलेम्हणुनी नावं दिल संतु तेली_
वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमीत्त संकेतदादा ने विनम्र अभिवादन केले. तसेच प्रमुख पाहुन्यांनी सुद्घा समाज प्रबोधनाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात समाज बांधवांची माेठया संख्येने उपस्थीती हाेती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयुर बडवाईक, संदेश ईखार, हेमंत मलेवार ,गुणवंत सेलाेकर,अनुज मलेवार, शुभम लांजेवार कार्तिक चिधांलाेरे, श्रीकांत मलेवार ,रुपेश लांजेवार,सचीन भाेंगाडे,शंकर सेलाेकर,भाष्कर बडवाईक,पवन किरपने,धनराजजी मेश्राम ,कैलास मलेवार,अभिषेक वैध,श्रीधर साखरवाडे,नवीन मानापूरे आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *