BREAKING NEWS:
महाराष्ट्र

💉 *लसीकरण रद्द करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही; महाराष्ट्र आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण*

Summary

👩‍⚕ लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 18 हजार 338 हून अधिक म्हणजे सुमारे 64 टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्यानंतर लसीकरणाच्या मोहिमेत तांत्रिक अडचणी आल्याचं निदर्शनास आलं. 🙅‍♂️ परिणामी रविवार आणि सोमवारी लसीकरण रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती […]

👩‍⚕ लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 18 हजार 338 हून अधिक म्हणजे सुमारे 64 टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्यानंतर लसीकरणाच्या मोहिमेत तांत्रिक अडचणी आल्याचं निदर्शनास आलं.

🙅‍♂️ परिणामी रविवार आणि सोमवारी लसीकरण रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सर्वांचं लक्ष वेधून गेली. ज्यावर राज्यातील आरोग्य विभागानं अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.

🧐 आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण..

▪️ कोरोना लसीकरण प्रक्रियेत नोंदणीसाठी केंद्रानं विकसित केलेल्या कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील लसीकरण रद्द करण्यात आलं असं म्हणत सोमवारी (18 जानेवारी) लसीकरण होण्याची शक्यता कमी आहे, अशी बातमी समोर आली होती.

▪️ ‘रविवार 17 जानेवारी आणि सोमवार 18 जानेवारी या दोन्ही दिवसांसाठी कोणत्याही प्रकारच्या लसीकरणाची आखणीच करण्यात आली नव्हती. त्यामुळं लसीकरण रद्द करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही’, असं राज्यातील आरोग्य विभागानं सांगितलं.

▪️ तर पुढील आठवड्यामध्ये केंद्राच्याच मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाची आखणी करण्यात येणार असल्याही सांगण्यात आलं. त्यामुळं लसीकरण रद्द झालं नसून, मुळात या 2 दिवसांसाठी या मोहिमेची आखणीच नव्हती हीच बाब आता लक्षात येत

💁🏻‍♂️ आठवड्यातून 4 दिवस लसीकरण- केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका आठवड्यातील 4 दिवसांमध्ये लसीकरण मोहिम राबवली जाऊ शकते. त्यामुळं राज्यांमध्येही त्यानुसारच लसीकरणाचं वेळापत्रकही तयार करण्यात आलं असून, त्याचाच अवलंब केला जात आहे.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *