BREAKING NEWS:
महाराष्ट्र

स्वत:च्या व्यवसायातून इतरांना रोजगार द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Summary

Nana Patole

????????????????????????????????????

भंडारा दि. १० : कोविड-१९ मुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. नौकरीच्या संधी अत्यल्प झाले आहे. सुशिक्षीत तरूण तरूणींची नौकरी साठीची भटकंटी थांबावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मीती योजनेतुन व्यवसाय इच्छूकांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी  ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरणार असून नौकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय उभारून इतरांना रोजगार द्या, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. बेरोजगारांना स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन व मदत करून तरूण तरूणींना उद्योगपती करण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सभागृहात ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ या व्यवसाय निर्मीतीच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एच.के.बदर, कौस्तुभ बुटला व संतोष पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ कार्यक्रमाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला.

भंडारा जिल्हा हा नैसर्गिक साधन संपत्तीने विपुल असा जिल्हा असून या जिल्हयात विविध क्षेत्रात व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. सुशिक्षित तरूणांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मीती योजनेतुन या संधी प्रत्येक व्यवसाय च्छूक तरूणांपर्यंत पोहचविण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न केले जाणार आहेत. अर्ज भरणे, अर्ज ऑनलाईन अपलोड करणे, बँक कर्ज प्रकरण तयार करणे, प्रोजक्ट रिपोर्ट तयार करणे, शॉप ॲक्ट मिळवून देणे तसेच व्यवसायासाठी लागणाऱ्या फिरत्यावाहनाचे दुकान स्ट्रक्चर तयार करून देणे या बाबीसाठी विनामुल्य सहकार्य करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. यासाठी साकोली व भंडारा येथे हेल्प डेस्क उभारला जाईल असे ते म्हणाले.

‘माझा व्यवसाय माझा हक्क’ या योजने अंतर्गत फिरत्या वाहनाद्वारे भाजी-फळे व्यवसाय, चाट भांडार, वस्तुचे निर्यात-आहार, वडापाव-भजे विक्री, आईस्क्रीम व्यवसाय, नास्ता लंच-डिनर व्यवसाय करू शकता. या व्यतीरीक्त आपल्या आवडीचा कोणताही व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र आहे. यासाठी सबसिडी देण्यात येणार आहे. व्यवसाय करणाऱ्या युवकांनी केवळ सबसिडीसाठी व्यवसाय न निवडता प्रामाणिकपणे व्यवसाय केल्यास आर्थिक प्रगती निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत सुद्धा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अर्ज नोंदणीसाठी 10 ते 30 डिसेंबर 2020 दम्यान विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या संधीचा लाभ घेवून व्यवसाय ईच्छूक तरूणांनी स्वत:च्या व्यवसाया सोबतच ईतरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा असे आवाहन त्यांनी केले.

‘माझा व्यवसाय माझा हक्क’ बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी व मोबाईल क्लिनिक या दोन्ही कार्यक्रमासाठी प्रशासन व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे सांगुन नाना पटोले म्हणाले की दर पंधरा दिवसांनी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येईल. योजनेची वैशिष्टे व नियम व अटी या बाबत जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एच.के.बदर व संतोष पवार यांनी सविस्तर माहिती दिली.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे : पासपोर्ट साईज फोटो (4 कॉपी), आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, विज बिल, जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाणपत्र व सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट. ही योजना शहरी व ग्रामीण अशा दोन भागात विभागली आहे. कागदपत्रे तयार करण्यासाठी हेल्प डेस्क विनामुल्य सहकार्य करणार आहे. अर्ज व अधिक माहितीसाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे जनसंपर्क कार्यालय, साकोली येथे संपर्क साधावा. संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक 9423673985, 9004367449 व 9004175649 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *