महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्याला मिळाले 250 कोटी रुपये अतिवृष्टी,महापुर नुकसान भरपाई चा दुसरा हप्ता

Summary

सोलापूर: सोलापूर सह महाराष्ट्रात जुनं ते आॅक्टोबंर कालावधी अतिवृष्टी झाली.महापुर आला. त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाई पोटी राज्य सरकारच्या वतीने आज मदतीचा दुसरा व अंतिम हप्ता जाहीर करण्यात आला आहे. या दुसऱ्या हप्त्यात सोलापूर जिल्ह्याला 250 कोटी 71 लाख 82 हजार […]

सोलापूर: सोलापूर सह महाराष्ट्रात जुनं ते आॅक्टोबंर कालावधी अतिवृष्टी झाली.महापुर आला. त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाई पोटी राज्य सरकारच्या वतीने आज मदतीचा दुसरा व अंतिम हप्ता जाहीर करण्यात आला आहे. या दुसऱ्या हप्त्यात सोलापूर जिल्ह्याला 250 कोटी 71 लाख 82 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे .
राज्य सरकारच्या महसुल विभागाने दोन हजार 192 कोटी 89 लाख रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला . त्यामुळे सोलापूर जिल्हा साठी 250 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे राज्यात सध्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची आर्दश आचारसंहिता सुरू आहे.
नुकसानीच्या मदतीचे वाटप करण्यासाठी हरकत नसल्याचे निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळिवले आहे. तरीही ही मदत वाटप करताना आर्दश आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घेण्याची सुचना महसूल व वन विभागाने त्या त्या जिल्ह्याला अधिकार्याना केली आहे.
एमडीआर एफ च्या दरानुसार व वाढीव दरानुसार शेतीपिकांसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी 25 हजार रुपये या प्रमाणे मदत केली जाणार आहे . सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीसाठी 503 कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. पहिल्या हप्त्यात सोलापूर जिल्ह्याला 251 कोटी तर दुसर्या हप्त्यात 250 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्याने शेतीच्या नुकसानीसाठी जेवढी मागणी राज्य सरकारकडे केली होती जवळपास तेवढा निधी सरकार कडून सोलापूर जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे.
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *